व्रतविधि-आषाढ शु. १३ दिवशीं या व्रतधारकांनीं शुचि जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौतवस्ने धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर विमलनाथ तीर्थकर प्रतिमा पाताळ यक्ष वैरौटी यक्षोसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांचो अर्चना करावी. चरु करावेत. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्ह-देव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं विमलनाथ तीर्थंकराय पातालयक्षवैरोटीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ सुगंधी पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जय करावा डी मतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत तेरा पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ मांडून महाये करावे. त्याने ओवा-डीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. सत्पात्रांस आडारदान थाचे. मम्हचर्यपूर्वक उपवास करून धर्मध्यानांत काळ घालवावा.