व्रतविधि – आषाढ शु. ३ दिवशीं या व्रतधारकांनी एकमुक्ति करावी. आणि ४ दिनीं प्रातःकाळीं शुद्धजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्ने धारण करात्रींत, सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिना-लयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनें-द्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मग पीठावर अभिनंदन तीर्थकर प्रतिमा यक्षेश्वर यक्ष व वज्रशृंखला यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांचौ अर्चना करून श्रुत व गणधर पूजा करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं अभिनंदनतीर्थंकराय यश्वेश्वरयक्ष बज्रशृंखलायक्षी-सहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत चार पाने मांडून त्यावर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. त्याने ओवाळीत मंदिरास तोन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. सत्पात्रांस आहारदान द्यावे. ब्रम्हचयपूर्वक धर्मध्यानांत काळ बालवावा. स्थादिवशी उपवास करावा. दुपरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणा करावी.
या प्रमाणे ८ चतुर्थी तिथीस पूजा करून कार्तिक कष्टान्हिकांत अभिनंदनतीर्थंकरविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चारी दाने द्यावीत. असा बाचा पूर्णविधि आहे.
– कथा-
हे व्रत पूर्वी साकेता (अयोध्या नगरींच्या एका राजानें यथा-विधि गुरुजवळ बेऊन केलें. त्यायोगें पुष्कळ ऐहिक सुखाचा अनुभव घेतला. एकदां त्वाच्या मनांत वैराग्यभावना उत्पन्न झाल्याने त्यानें गुरुजवळ जिनदोक्षा घेतली आणि घोर तपश्चर्या केली, आयुष्यांती स्वर्गात देव होऊन जन्मला. तेथील दिव्यसुख ओगून आयुष्यावसानी तेथून च्यवून द्वारकानगरीमध्ये समुद्रविजय राजा भाणि शिवादेवी राणी यांचे उदरों नेमिनाथ तीर्थकर होऊन जन्मला. पुढे बालब्रह्म-चर्येच्या बलाने सर्वकर्माचा क्षष करून तो मोक्षास गेला. असा याचा दृष्टांत आहे. श्रेणिक महाराजा व चलनाराणी यांचीच कथा बेजे घ्यावी.