व्रतविधि-आषाढ शु. १ दिवशी वा प्रतिकांनी एकमुक्ति करावी, नाणि २ दिवचीं श्रातःकाळी शुचिजकाने अभ्यंगस्नान करून
अंगावर दृढधीत वर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हाती घेऊन जिनालयास जावे, मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्वापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर अजितनाथ तीर्थकर प्रतिमा महायक्ष यक्ष व रोहिणी यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्ट द्रव्यांनी त्यांची अर्चना करावो. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व बहादेव यांचे अर्चन कराने, ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं अजितनाथतीर्थंकराय महायक्ष-यक्षरोहिणीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पत्रांत दोन पार्ने लावून त्यावर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावे व त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. देवापुढें नंदादीप लावावा. देवांस पुष्पहार घालावा. त्यादिवशीं उपवास करून ब्रह्मचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणा करावी,
याप्रमाणे ४ चार मोहने प्रतिदिवशीं अभिषेकादि पूजा करावी. व एक पुष्पमाला वाहावी. शेवटी कार्तिक आष्टान्हिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळीं अजितनाथविधान वरून महाभिषेक करावा. चतुःसंघास चारी दाने द्यावींत असा याचा पूर्णविधि आहे.
कथा-
पूर्वी हैं व्रत पूर्णभद्र व मणिभद्र यांनी गुरुजवळ घेऊन केले होते; त्यामुळे अनेक ऐश्वर्याचा अनुभव घेऊन शेवटी विरागी बनून जिन-दीक्षा घेतली. घोर तप करून तो स्वर्गास गेला. पुढे क्रमाने मोक्षास गेला आहे. असा याचा दृष्टांत आहे. श्रेणिक महाराजा व चलना राणो यांचीच कथा येथे घ्यावो.