व्रतविधि – आचढ शु. ७ दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. ८ दिनीं प्रमातीं प्रासुक उदकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ घौतवस्त्र धारण करावी. सर्व पूजाद्रव्ये बरोबर घेऊन जिनालयास जांचे मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पोठावर आदिनाथ तीर्थंकर प्रतिभा गोमुखयक्ष चक्रेश्वरी यक्षोसह स्थानून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा, अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी, चरु करावेत, श्रुत व गगधर यांची पूजा करून यक्ष, यही व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं आदिनाथतीर्थंकराय गोमुखयक्ष चक्रेश्वरीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुणे घाला-वींत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. हो व्रतकथा वाचावी. एक पान लावून महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरात तीन प्रदक्षिणा घ.लून मंगलारतो करावी. त्यादिवशीं ब्रम्हचर्यपूर्वक उपवास करावा. सत्पात्रांस आहारदान देऊन धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावें.
याप्रमाणें आठ आष्टमी तिथीस पूजा करून कार्तिक आष्टान्हिक पर्वांत याचे उद्यापन करावें. त्यावेळीं आदिनाथविधान अथवा भक्तामर विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चारो दानें द्यावींत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
हे व्रत पूर्वी आपल्या भवांतरीं मेघेश्वर यानें यथाविधि पाळिलें होते. म्हणून तो भरतचक्रवर्तीचा मुख्य सेनापति झाला. पुष्कळ दिवस संसारसुख भोगून शेवटीं तो जिनदीक्षा घेऊन आदिनाथ तीर्थकर समव-सरणांत गणधर झाला व शुक्लध्यानाने सर्व कर्मक्षय करून मोक्षास गेला. असा याचा दृष्टांत आहे. श्रेणिक महाराज्जा व चलना महाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.