व्रतविधि – भाद्रपद कृ. ३० दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि आश्विन शु. १ दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्ने धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हाती घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्या-पथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर आदिनाथतीर्थंकर प्रतिमा गोमुखश्क्ष व चक्रेश्वरी यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं आदिनाथतीर्थंकराय गोमुखयक्ष-चक्रेश्वरीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ चंपकपुष्पे घालावीत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्रानें १०८ वेळां जप करावा श्रीआदिनाथ चरित्र वाचून ही व्रतकथाही वाचावी. महाये करून त्याने ओवाळोत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. यथाशक्ति उपवासादिक करावे. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावींत रात्री जागरण करून भर्मध्यानांत काल घालावावा.