व्रतविधि – मकरसंक्रमणव्रतविधींत पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरक – चैत्र मासांत मेषसंक्रमण येईल त्या दिवशीं हैं व्रतपूजन करण्यास प्रारंभ करावा. आदिनाथ तीर्थकराराधना मंत्र-जाप्य, स्वस्तिक वगैरे कथा पूर्ववत् समजावें.
सूचना-वर निर्दिष्ट केलेल्या कथा मकरसंक्रमणवत कथेपासून मेषसंक्रमण व्रतकथेपर्यंत-बारा कथा. वृषमापासून वासुपूज्य तीर्थकरापर्यंत आराधना करावयाच्या आहेत. मेषसंक्रमणांत-आदिनाथ वृषम संक्र-मणांत अजित याप्रमाणे बारा संक्रमणांत बारा तीर्थकरांचो आराधना कनाने करावयाची आहे.