व्रतविधि – आषाढ शु. ८ दिवशीं या व्रतिकांनी शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जायें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठोची पतिमा स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्याची अर्चना करावो. पांच प्रकारचे चरु करावेत. श्रुत व मणधर यांची पूजा करून यक्ष. यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रीं अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंदादीप लावावा.एक फुलांचो माळ वहावी. नंतर एका पात्रांत पांच पाने लावून त्यावर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेऊन महार्थ करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. याप्रमाणे प्रत्येक अष्टमी व चतुर्दशीस १०८ पुर्ने घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ पूजाक्रम करावा. मात्र प्रतिदिनी क्षीराभिषेक करावा. पुष्पमाला बहावो. या प्रमाणें चार महिनेपर्यंत करावे. प्रतिदिवशी एकेक वस्तु सोडून मोजन करावे. सत्पात्रांस आहारदान द्यावे. ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. शेवटी कार्तिक्रपौर्णिमे दिवशीं याचे उद्यापन करावें. त्यावेळीं पंचपरमेष्ठीविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंधास चारी दार्ने द्यावीत, असा याचा पूर्णविधि आहे.