व्रतविधि-आषाढ शु. ७ दिवशी या प्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि ८ दिनों प्रभात शुद्धोदकाने अभ्यंगस्नान करून नेपा-दृढधीतवले धारण करावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनाल यात जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून पशुद्धिपूर्वक जिनेद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर अजितनाथ तीर्थंकर प्रतिभा महायक्ष यक्ष रोहिणी मझीसह स्थापून तिला पंचामुलांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करात्री, देवापुढे नंदादीप लावून एका पाटावर नऊ पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये ठेवावी. श्रुत व गण-धर यांची पूजा करून यक्ष, यक्षो व ब्रम्हदेव यांचे अर्चन करारे, ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं अजितनाथतीर्थंकराय महायक्ष रोहिणीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुर्षे बाला-बींत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी, एका पात्रांत नऊ पार्ने लावून त्यांवर अन्नद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्थ करावे. त्यानें ओवाळोत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मेग-कारती करावी. त्यादिवशी उपवास करून ब्रम्हवर्षपूर्वक धर्मध्यानांतकाल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणा करावी. याप्रमाणे प्रत्येक अष्टमी आणि चतुर्दशीस पूजाक्रम करावा. असे चार महिने पूर्ण झाल्यावर अंतीं कार्तिक आष्टान्हिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळी अजितनाथ तीर्थ करविधान करून महाभिषेक करावा. नंदादीप चार महिने लावावा. नऊ प्रकारच्या धान्यांचे नऊ पुंज देवापुढे घालावेत. चारी संघास चारी दाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.