व्रतविधि-आषाढ शु. १० दिवशीं या व्रतिकांनीं एक-भुक्ति करावी. आणि एकादशी ११ दिनीं प्रातःकाळीं शुचि-जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवर्षे धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन मंदिरास जावें. जिनालयास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर संभवनाथ तोर्थकर प्रतिमा त्रिमुख यक्ष व प्रज्ञप्ति यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. देवापुढे नंदादीप लावून एका पाटावर तीन पार्ने लावून त्यांवर अक्षता, फलें, फुलें, चरु तिळाचे लाडू, केळीं, करंजा, मडगी, भिजा वण्या ठेवाव्यात. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेत्र यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं संभवनाथ तीर्थंकराय त्रिमुखयक्षप्रज्ञाप्तियक्षी सहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. मग एका पात्रांत तीन पाने लावून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावे. त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा बाळूत मंगलास्ती करावी. त्यादिवशी उरवास करावा. दुसरें दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे.
याधमाणे प्रत्येक शुद्ध व कृष्णपक्षांत एकदा त्याच तिथोस पूजा-कम करावा. शेवटी कार्तिक नंदीश्वर पवीत याचे उद्यापन करावे, त्यावेळी संभवनाथ तीर्थकर विधान करून महाभिषेक करावा. चतुःसे-घास चतुर्विधदाने यात्रीत. तोन दंपतीस मोजन करवून त्यांना वस्त्रा-हंकार करून त्यांच्या ओटीत पान, अक्षता, केळीं, अंबे वगैरे फळे घालून त्यांचा सत्कार करावा. असा याचा पूर्णविधि आहे.
कथा-श्रेणिकमहाराजा व चलना महाराणी यांचोच कथा येथे घ्यावी.