व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फल्गुन या मासांतील कोणत्याहि एका नंदीश्वर पर्यंत या व्रत धारकांनीं शु ७ दिवशीं एकमुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ. धौतवस्ने धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर अभिनंदन तीर्थकर प्रतिमा यक्षेश्वर यक्ष व वज्रशृंखला यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभि-षेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांचो अर्चना करावी. देवापुढे नंदादीप लात्रावा. एका पाटावर चार पार्ने क्रमाने मांडून त्यांवर अक्षता, फर्ले, फुले, नैवेद्ये ठेवावींत. श्रुद व गणधर यांचो पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें, ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं अभिनंदनतीर्थंकराय यक्षेश्वरयक्ष वज्रशृंखलायक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत चार पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महाचे करावे. स्पाने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास फरावा, ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशी पूजा व दान करून आपण पारणे करावें. याप्रमाणे चार महिने प्रत्येक अष्टमी व चतुर्दशीस पूजाक्रन करावा. शेवटीं कार्तिकाष्टान्द्रिकांत उद्यापन करावे. त्यावेळी अभिनंदन तीर्थकरविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चारी दाने यावीत. चार दंपतीस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करावा. अत्ता याचा पूर्णविधि आहे.
कथा-श्रेणिक महाराजा व चलना महाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.