व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या महिन्यांतील कोणत्याहि एका नंदीश्वर पर्वात शुद्ध अष्टमी पासून पूर्णिमेपर्यंत आठ दिवस या व्रतिकांनीं प्रभातीं शुचि जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्रं धारण करावीत, सर्व पूजा सामुग्री बरोबर घेऊन जिनाब्यात जावें.तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. जिनेंद्रास भक्तींनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर जिनेंद्राची प्रतिमा स्थापन करून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा.
वेळां पुष्पें घालावीत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. मग श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचें अर्चन करावें, नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी.
याच क्रमानें चार महिने नित्यपूजा करावी. याप्रमाणें पूजाक्रम पूर्ण झाल्यावर अर्हत्परमेष्ठीची महाभिषेक पूजा करून या व्रताचें उद्या- पन करावें. त्यावेळीं बारा वेळवाच्या लहान करंड्या आणून त्यांत बारा प्रकारचे धान्य भरावें. त्यावर टोपणें शांकून कमाने बारा कलश ठेवूम त्यांत दूध आणि तूप भरार्वे. व त्यांत सुवर्ण ‘पुष्यहि घालावे. प्रत्येक कळशास सूत गुंडाळलेले असावे. गंधाक्षता, हळदकुंकु लावावा. कल- शाबर भिजलेले हरभरे, पायस, अन्न, खडीसाखर, बारा पोळ्या, कडाकण्या, [ मंडगी ] लाडू हे पदार्थ ठेवावेत. मग एक मण तांदळाचे बारा पुंज [ राशि ] घालून त्यांच्यावरती हे कुंभ ठेवावेत. नंतर जिनें- द्रास महाभिषेक पूजा करावी. या बारा वायनांतून देव, शास्त्र, गुरु, पद्मावती, ज्वालामालिनी, व जलदेवता यांच्यापुढे क्रमाने एकेक वायन ठेवावें. कथा सांगणाऱ्या पुरोहितास एक, आर्थिकेस एक आंणि चार कुलवान् सुवासिनी त्रियांस चार बायर्ने द्यावीत. याप्रमाणे बारा वायनें अर्पण करावीत. असा याचा विधि आहे.
– कथा –
जंबूद्वीपांतील भरतक्षेत्रांत मगध नांवाचा विशाल देश आहे. त्यांत राजगृही नामक नगरी आहे. तेथे श्रेणिक राजा आपल्या चलना राणीसह सुखाने नांदत होता. नित्यनियमाप्रमाणे विपुलाचल पर्वतावर समवसरणांत गेले असतां ‘एकदां त्याच नगरीचा राजश्रेष्ठी जयसेन व त्यांची वर्मपत्नि जयसेना ही दंपति समवसरणांत जाऊन तेथील सर्व विमुवरांस भक्तीनें नमस्कार करून गौतम गणधरासमीप जाऊन बसली. तेव्हां जयसेना ही गणेंद्रास आपले करयुग जोडून विनयानें बोलली कीं; हे जगद्गुरो ! आज आपण आम्हांस सर्व सुखाला कारण असे व्रतविधान सांगावें. हे तिचे नम्र वचन ऐकून ते गणेंद्र म्हणाले हे कन्ये ! आतां तुला ‘वसरबळगद’ हे व्रत पालन करावयास अत्यंत योग्य आहे. कारण हें व्रत जे नरनारी भक्तीनें ग्रहण करून पालन करतात; त्यांना इहलोकीं संतती, संपती, इत्यादि- कांचे सुख तत्काळ मिळतें. पुढें परलोकीं ही पुष्कळ सुख भोगावयास मिळून शेत्रटी क्रमाने मोक्षसुखही अवश्य मिळते. असे या व्रताचे महत्व आहे. असे म्हणून त्यांनी या व्रताचा सर्व विधी सांगितला. ते सर्व निरूपण ऐकून त्या दंपतीस मोठा संतोष झाला. मग त्या जयसनेनें गुरूंत भक्तीने वंदना करून हे व्रत ग्रहण केलें. नंतर ते दोघे आपल्या नगरी परत आले.
पुढे कालानुसार त्या जयसेना जीनें हें व्रत पालन करण्यास प्रारंभ केजा. तेव्हां एकेदिवशी ती जिनमंदिरांत व्रताचरण करून आपल्या घरी येत असतां मार्गात विजयसेना नामक जीची गांट पडली. तेव्हां तो म्हणते, अहो आकाताई ! तुम्ही आज इकडे कोठें गेला होता ? तेव्हां ती म्हणाली, अहो बाई! आज मी ‘वसरवळगदव्रत ‘ हे करण्यासाठी जिनालयी गेले होत्ये. हे तिचे भाषण ऐकून या व्रताच्या पालनाविषयों तिच्या मनांत आतुरता उत्पन्न झाली. त्यामुळे ती तिला म्हणाली, अहो आका ! आतां मला या व्रताचें विधान व फल निवेदन करावे. म्हणजे मीहि हें व्रत विधीपूर्वक पालन करित्ये. हे तिचें वचन ऐकून तिने तिला या व्रताचे विधान व फल सविस्तर सांगितलें.
नंतर ती विजयसेनाहि गुरुजबळ हे व्रत स्वीकारून यथाविधि पाळू लागली. अल्पावधीतच तिच्या गृहीं पुत्र सुना, धन, वगैरे संप- तीची वृद्धि झाल्यामुळे ती संसार सुखांत आसक्त झाली. त्यायोगें ती गर्विष्ठ होऊन व्रताचरण सोडली. त्याकारणानें ते सगळे पुत्र निराळे झाले, धनसंपत्तीही नाहींशी झाली. सर्व गेले. मग ते पतिपत्नि दुसऱ्या एकाच्या घरी जाऊन राहिले. अशी त्यांची अत्यंत दुर्दशा झाली. इतक्यांत एके दिवशीं एक सुभद्र नामक महामुनि चर्यामार्गानें तिच्या बरासमोर आले. तेव्हां योग्य रीतीनें त्यांचें प्रतिग्रहण करून त्यांना गृहीं नेवून नवधाभक्तिपुरःसर तिने आहारदान दिले. नंतर मुनि आस- नावर स्वस्थ बसले असतां, तिर्ने विनयानें दोन्ही कर जोडून त्यांना म्हटले, हे महास्वामिन् ! आतां आमची अशी दुर्दशा कां शाली ! माझे पुत्र निराळे झाले, लक्ष्मी निघून गेली, दैन्यावस्था प्राप्त झाली वगैरे याचे कारण काय ? हे ऐकून ते मुनीचर आपल्या अवधिज्ञानानें तिची सर्व परिस्थिती जाणून तिला म्हणाले, – हे कन्ये ! तूं जे व्रत गुरुसन्निध ग्रहण करून पालन करीत होत्येस, ते पूर्ण रीतीनें पाउन न करतां मध्येच गर्वानें सोडून दिलेस त्या पापफलाने आतां तुझी ही दुःस्थिती झाली आहे. त्याकरितां ते व्रत पुनः दं यथा- स्थित पूर्णरीतीनें पालन कर. म्हणजे तुझी दुःखदस्थिती शीघ्र दूर होईल. हे ऐकतांच ती एकदम आपल्या पापाला न्याळी आणि पुनः ते व्रत पूर्ववत् पालन करूं लागली. व्रतपूर्ण पालन केल्यानंतर शेवटी तिर्ने त्याचें उद्यापन केलें. त्या व्रत महात्म्यानें पुनः तिला पूर्ववत् पुत्र, सुना, धनसंपत्ति इत्यादिकांचा संयोग झाला; त्यामुळे ती संसारविषयांच्या भोगांत व धर्ममार्गात आपले आयुष्य सुखानें घालवू लागली. पुढें स्वर्गादि सुखाचा अनुभव घेऊन क्रमानें कर्मनिर्जरा करून मोक्षपद पावली. त्याचप्रमाणे ती जयसेनाहि सर्व संसारभोगाचा अनुभव घेऊन क्रमानें मोक्षपदीं गेली.