व्रतविधि-आषाढ शु. १३ दिवशीं या व्रतधारकांनी एकमुक्ति करावी. आणि १४ दिवशीं पभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिना-लयास जावें. मंदिरास तोन प्रदक्षिणा घालून इंर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तोनें साष्टांग नमस्कार करावा. पौठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून निचा पंचामृतांनी अभिषेक करावा. पाटावर पांच स्वस्तिकें काढून त्यांवर पार्ने, अक्षता, फले, फुले, चरु वगैरे ठेवून अष्टद्रव्यांनी पंचपर-नेष्ठींचो आराधना करावी. श्रुतव गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे, ॐ ह्रीं अर्हं अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत पांच पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. त्याने ओवाळीत मंदिरास तोन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणें करावें. तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक घर्मध्यानांत काल घालवावा. याप्रमाणे शुद्ध व कृष्ण १४ स पूजाक्रन करावा. शेवटीं कार्तिक नंदोश्वर पवौत याचे उद्यापन करावे. त्यावेळीं पंचपरमे-ष्ठोबिधान करून महाभिषेक करात्रा. चारी संघास चारप्रकारचीं दाने बाबींत. असा याचा पूर्णविधि आहे.
कथा-श्रेणिक नहाराजा व चलना महाराणी यांचोच कथा येथे घ्यावी.