व्रतविधि – कार्तिक शु. ४ दिवशीं या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि ५ दिवशीं प्रातकाळीं शुद्धोदकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढवीतवस्त्र धारण करारींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयात जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईयापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांचो अर्चना करावो, पंचपकान्नांचे चह करावेत. देवापुढे एका पाटावर पांच स्वस्तिके काढून त्यांवर पार्ने, अक्षता, फळे, फुड़े चह वगैरे मांडून श्रुत व गणधर पूजा करावी, यज्ञ, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्थन करावे. ॐ ह्रां ह्रीं दी हैः अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा । या मंत्राने १०८ पुष्धे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जर करावा, ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत पांच पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महाये करावें. त्याने ओवाळोत मंदिरास तोन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. सत्पात्रांस आहारदान द्यावे. त्यादिवशीं उपोषण करावे. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे. तीन दिवस ब्रह्मवर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. या प्रमाणे हे व्रतपूजन महिन्यांतून दोन वेळां त्याच तिथीस करावे. अशा नऊ पूजा झाल्यावर फाल्गुन आष्टान्हिक पर्वांत याचे उद्यापन करावे, त्यावेळी पंचारमेष्ठो विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघात चतुर्विध दाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे.
कथा – श्रेणिकराजा व चलना महाराणी यांचीच कथा घ्यावी.