व्रतविधि – भाद्रपद शु. ३ दिवशीं या व्रत ग्राहकांनी शुचि जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वखें धारण करावीत,
सर्व पूजा सामग्री आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. जिनेंद्रास साष्टांग नमस्कार करावा. मंडपश्रृंगार करून देवापुढे शुद्ध भूमीवर ७२ कोष्टकांचें यंत्रदल पंचवर्णानीं काढून त्या कोष्ठकांत पूर्व- दिशेपासून क्रमानें भूत-वर्तमान-भविष्य या तीनकाळाच्या तीर्थक- रांचीं नांवें लिहावीत. त्याच्या सभोंवतीं चौकोनी पंचमंडळे काढावीत. आठकोनीं अष्टप्रातिहार्ये ठेवावीत. आठदिशेंत आठकुंभ स्थापावेत. यंत्रद्छामध्ये एक सुशोभित श्वेतसूत्रवेष्टित कुंभ ठेवावा. वर चेद्रोपक बांधावे. मग श्रीपीठावर त्रिकाल तीर्थकर प्रतिमा किंवा चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करात्रा. नंतर एका ताटांत गंधानें यंत्र पूर्ववत् काढून त्यांत ७२ पार्ने, गंधाक्षता, फुले, फळे वगैरे लावून तो ताट त्या यंत्रदळांतील मध्य कुंमावर ठेवावा. त्यावर त्रिकाळ तीर्थकर प्रतिमा ठेवून त्यांचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला ही म्हणत अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. ( त्यांच्या बीज मंत्रांनी प्रत्येक कोष्टकांत श्रीफळ ठेवून पूजा करावी.) ॐ हीं श्रीं कीं ऐं अई निर्वाणादिद्वा सप्ततित्रिकालतीर्थकरेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ फुडें घालावीत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून तीर्थकर चरित्रे वाचावीत. व्रतकथा वाचावी. णमोकार मंत्राचा अष्टोत्तरशतीचे तीन जप करावेत. त्यानंतर श्रुत, गुरु यांची पूजा करावी. यक्ष, यक्षी, ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. एका ताटांत ७२ पानें क्रमवार लावून त्यांबर अष्टद्रव्यें ठेवून महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. त्या दिवशीं उपवास करून धर्म- घ्यानांत काल घालवावा. ब्रम्हचर्य पाळावें. दुसरें दिवशीं प्रातःकाळी जिनेंद्रास भक्तीनें नमस्कार करून घरी यावें. सत्पात्रांस आहारादि दानें देऊन मग आपण पारणा करावी.
याप्रमाणे हे व्रत तीन वर्षे पाळून शेवटीं त्याचें उद्यापन करावे. त्यावेळी त्रिकालतीर्थकरांची आराधना करावी. चतुःसंघास आहारादि दानें देऊन त्यांना आवश्यक वस्तु ही द्याव्यात. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
कथा
या भरत क्षेत्रांमध्यें मगध नांवाचा एक विशाल देश असून त्यांत कांचीनगर नामक एक मनोहर पट्टण आहे. तेथें पूर्वी पिंगल नांवाचा गुणवान्, नीतिमान् व पराक्रमी असा राजा राज्य करीत होता. त्याला सागरलोचना नांवाची अत्यंत स्वरूपवती, लावण्यवती व गुणवती अशी पट्टस्त्री होती. त्यांना सुमंगल नांत्राचा एक गुणी धर्मिष्ठ, सदाचारी असा पुत्र होता. यांच्यासह तो राजा सर्व प्रजाजनांस आनंद देत राज्यै- श्वर्य भोगीत असे.
एकेदिवशीं युवराज सुमंगल हा नगराच्या बहिस्थानांत वन- झोडेकरितां, गेला असतां तेथें पूर्णलागर नामक महातपोनिधी अवधि- ज्ञानी येऊन उतरले होते. अकस्मात् त्यांना पाहतांच तो युवराज तेथे जाऊन त्यांना तीन प्रदक्षिणा घालून मोठ्या भक्तीनें वंदना करून त्यांच्या सन्निध बसला. त्यांच्या मुखानें कांहीं वेळ मोठ्या श्रद्धेनें धर्मामृत प्राशन केल्यावर तो त्या मुनीश्वरांस म्हणाला, हे दयानिधे स्वामिन् ! आतां आपली मोहक व रम्यमुद्रा पाहून माझ्या मनांत आपल्या विषयीं अत्यंत मोह उत्पन्न होत आहे. याचें कारण काय असावे ? ते मला आपण कृपा करून निवेदन करावें.
हे त्याचे नम्र वचन ऐकून आपल्या अवधिज्ञानानें त्याचा पूर्व संबंध जाणून ते मुनीश्वर त्यांस म्हणाले, हे राजपुत्रा ! माझ्यावरतीं असा मोइ उत्पन्न होण्याचे मूळ कारण काय आहे ? तें तुला समज- ण्यासाठीं तुझा भवप्रपंच सांगतो ऐक.
या जंबू द्वीपांतील भरत क्षेत्रांत आर्यखंड आहे. त्यांत अत्यंत विशाल असा कुरुजांगल नांवाचा देश आहे. त्यामध्ये हस्तिनापुर नांवाचे सुंदर पट्टण आहे. तेथे पूर्वी कामुक या नांवाचा राजा राज्य करीत असे. त्याला कमललोचना नामें एक मनोहर पट्टराणी होती. त्यांना विशाखदत्त नांवाचा एक सुंदर पुत्र होता. राजाचा वरदत्त नामक एक श्रेष्ठ व चाणाक्ष असा मंत्री होता. त्याला विशालनेत्री नाम्नी सुशील, रूपवती स्त्री होती. त्यांचें उदरी विजयसुंदरी नांवाची अत्यंत लावण्यवती व सदाचारिणी अशी कन्या जन्मली. या सर्व परिवार जनांसह तो राजा धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थाचें साधन करीत सुखानें राज्यैश्वर्य भोगीत होता. त्या प्रधानाची कन्या विजयसुन्दरी ही उपवर झाली. तेव्हां प्रधानानें युवराज विशाखदत्त यांच्याशी तिचा विवाद करून दिला. मग ते पतिपत्नि परस्पर प्रेमाने सुखांत काल क्रमीत असतां पूर्वकर्माच्या उदयानें त्या राजपुत्रास एक असाध्य रोग उत्पन्न झाला. त्यायोगानें तो मरण पावला. तेव्हां सर्वाना फार दुःख झालें.
पुढे एकेदिवशी ज्ञानसागर नामक महामुनीश्वर चर्येकरितां राजवाड्यांत आले. तेव्हां राजानें यथायोग्य प्रतिग्रहण करून मोठ्या भक्तीनें त्यांना आंत नेलें व नवधाभक्तिपूर्वक आहारदान दिलें. निरंतराय आहार झाल्यावर ते मुनीश्वर तेथेंच एका आस- नावर बसले असतां राजपुत्राची दुःखद वार्ता त्यांना समजतांच मुनीश्वरांनी सर्वास सदुपदेशानें अनेकप्रकारें समजावून शांत केलें. मग मुनीश्वर वनांत आपल्या स्थानीं निघून गेले. परंतु ती विजय- सुंदरी मात्र पतीच्या वियोगानें अत्यंत शोकाकुल होऊन डोळ्यांतून अश्रु ढाळीत निरंतर बसू लागली.
एकेदिवशीं क्षांतिमति ह्या नांवाची एक विदुषी, धर्मज्ञ अशी आर्थिका चर्येसाठीं राजवाड्यांत आली. तेव्हां राणीनें तिचे प्रतिग्रहण करून तिला योग्य प्रकारें आहारदान दिलें. तेथे कांहीं वेळ ती आर्थिका शांत बसली. तेव्हां तिला तिच्या पुत्रवियोगाची दुःखमय वार्ता सम- जतांच तिनें चांगल्याप्रकारें धर्माचा बोध करून सर्वांना सांतविलें. मग तिनें त्या विजयसुंदरी जवळ जाऊन तिला नानाप्रकारें धर्मो- पदेशाच्या गोष्टी सांगून शांत केलें. हे कन्ये ! अशा आर्तध्यानामुळे तुला दुर्गतींत भयंकर त्रास भोगावें लागेल. तेव्हां तूं आतां भवदुःखाला कारण असा शोक करीत बसूं नको. या दुःखाचे निवारण करण्या- करितां आणि भवदुःखाचा परिहार होऊन उत्तम सुखाची प्राप्ती होण्या- साठीं तुला एक सदुपाय सांगते, ऐक. आतां तूं ‘त्रिकालतृतीया ‘ व्रत हैं यथाविधि पालन कर. असें म्हणून तिनें त्याचा सर्व विधी सांगितला.
याप्रमाणें त्या क्षांतिमति आर्थिकेच्या मुखानें सर्व व्रतविधि ऐकून त्या विजयसुंदरीस अत्यंत समाधान झाले. मग तिनें त्या आर्थिकेस प्रार्थना करून हे व्रत घेतले. त्यानंतर त्या आर्थिकाबाई आपल्या स्थळीं निघून गेल्या. पुढें योग्यकाली ती विजयसुंदरी हें व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन करती झाली. त्या व्रतप्रभावानें ती स्रीलिंग छेदून सोळाव्या स्वर्गात देव होऊन जन्मली. मग तो स्वर्गीय देव आयुष्यांती तेथून च्यवून इहलोकीं कांचीनगरी पिंगल नामक राजाच्या पोटीं जन्मला. तोच तूं हा सुमंगल आहेस. आणि त्या विजयसुंदरीस अनेक प्रकारें बोधप्रद उपदेश देऊन ‘त्रिकालतृतीया’ व्रत दिलेली जी क्षांतिमती आर्थिका तीच जन्मांतरी हा मी मुनि झालों आहे. असा माझा आणि तुझा पूर्वजन्मींचा निकट संबंध आहे. त्याकारणानें तुझ्या मनांत माझ्या विषयीं मोह उत्पन्न होत आहे. परंतु आतां संसारांतील दुःखद प्रबल मोहनीयकर्माचा क्षय करून लौकरच तूं मुक्त होणार आहेस.
असा हा आपला पूर्वभवींचा विस्तार ऐकून त्या सुमंगल युवरा- जांस अतिशय आनंद झाला. मग त्यानें पूर्णसागर मुनीश्वरांच्या चरणीं भक्तीनें वंदना करून श्रावकत्रतें घेतलीं. नंतर तो आश्वर्यानें आपल्या विचित्र भवांचा विचार करीत नगरी परत आला.
पुढें एकदां एका कमळाच्या कुड्मलांत सांपडून मेलेल्या भ्रमरास पाहतांच त्याच्या मनांत विचित्र व दुःखद संसाराविषयी वैराग्य उत्पन्न झालें. तेव्हां तो तत्काळ वनांत जाऊन निर्ग्रथमुनींश्वरांजवळ दिगंबर दीक्षा घेऊन घोर तपश्चरण करूं लागला. त्याच्या सामर्थ्यानें सर्व कर्माचा क्षय करून तो मोक्षास गेला, व तेथे अनंतफाल सिद्धसुखाचा अनुभव घेऊं लागला.