व्रतविधि-श्रावण कृष्ण १ दिवशी प्रातःकाळी या अतिकांनी उष्णोदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत बर्षे धारण करावीत. सर्व पूजा साहित्य हाती घेऊन चैत्यालयास जावें. मंदिरास तीन प्रद- क्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनास साथंग प्रणाम करावा. श्रीपीठांत जिनेंद्रास स्थापून त्याला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत, गुरु पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे. ” ॐ न्हीं श्रीं ह्रीं ऐं अई अईत्पर- मेष्ठिने नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. श्रीजिन- सहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. एक मासपर्यंत ब्रह्मचर्यपूर्वक एकमुक्ति करावी. पांच अणुव्रतें, तीन गुणव्रतें, चार शिक्षात्रतें पाळावीत. दूध, दहीं, तूप, तेल, साखर, गूळ, मीठ या सात वस्तूंचा त्याग करावा. मध्यंतरी अशौच प्राप्त झाल्यास शुद्धिच्या वेळीं अंगास ताक लावून स्नान करावें. याप्रमाणे भाद्रपद कृष्ण १ पर्यंत प्रतिदिवशीं पूर्वोक्त क्रिया कराव्यात. भाद्रपद कृष्ण १ दिवशींच या व्रताचे उद्यापन करावें. त्यावेळीं अईत्प- रमेष्ठीस महाभिषेक करावा. सप्तरस भरीत सात ७ मोगे (लोटकी ) पैर्की, तूप भरलेले मोगे देवापुढें, साखर भरलेले सरस्वती पुढे, गूळ भरलेले गुरूपुढे, ठेवून मीठ भरलेले आपण घ्यावें. उरलेले तीन ३ सम्यग्दृष्टी श्रावकांना आहार व वस्त्रदान देऊन द्यावें. सात ऋषींना आहारदान द्यावें. त्यांना आवश्यक वस्तूंही द्याव्यात. असा या व्रताचा पूर्ण विची आहे. त्रिकरण शुद्धीनें हैं व्रत केल्यास क्रमानें मोक्षसुख अवश्य मिळेल. हें व्रत श्रेणिक राजा व चलना राणी यांनी केलें होतें, त्यामुळे त्यांना सद्गति मिळाली.