वरील व्रतकथेस आणि या व्रतकथेसहि निराळी कथा नाहीं. श्रेणिक राजा आणि चलना राणी यांनी हे व्रत यथाविधी पाळून त्याचे उद्यापन केले. त्यायोगे त्या श्रेणिक राजास क्षायिकसम्यक्त्व माप्त होऊन षोडशभावना भाविल्या म्हणून तीर्थकर कर्मप्रकृतीचा बंध पडला आहे. आणि चलना राणी ही अंतीं आर्यिका होऊन सन्यासविधीनें मरून खीलिंग छेदून स्वर्गात देव झाली. तेथे तो देव चिरकाल पुष्कळ सुख भोगूं लागला.
व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासांत शुभ- दिवशीं या व्रत धारकांनी प्रातःकाळीं शुचि जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवखें धारण करावीत. मग सर्व पूजा साहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयांस जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रांस भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीसिद्धप्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. आणि अष्टद्रव्यांनी त्यांची पूजा करावी. पंचपकानांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ हीं अई अष्टकर्मरहिताय श्री- सिद्धाधिपतये नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. सिद्धमक्ति म्हणून शाख- स्वाध्याय करावा. ही व्रतकथाहि वाचावो. एका पात्रांत आठ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेवून महार्थ करावें. आणि त्यानें ओवा- ळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करात्री. त्यादिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काळ घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यार्थीत ब्रम्हचर्य पाळावें दुसरे दिवशीं पारणा करावी.
याप्रमाणें ज्ञानावरणीय कर्मक्षयार्थ ८ पूजा व ८ उपवास करावेत.
मग दर्शनावरणीय कर्मक्षयार्थ पूर्ववत् ८ पूजा व ८ नीराशनें (आठ दिवस जछपान करावें) करावीत. नंतर वेदनीयकर्मक्षयार्थ पूर्ववत् ८ पूजा व ८ फळाहार करावेत. आणि मोहनीयकर्मक्षयार्थ पूर्ववत् ८ पूजा व आठदिवस एकेक अन्नप्रास घ्यावा. त्यानंतर आयुकर्मक्षयार्थ पूर्ववत् ८ पूजा व ८ मेलोगर (आंबटभात कानडीत बाघ्र) करावेत. मग नामकर्मक्षयार्थ पूर्ववत् ८ पूजा करून ८ दिवस पोळ्यांचे भोजन करावे. गोत्रकर्मक्षयार्थ पूर्ववत् ८ पूजा व….. … आणि अंतराय कर्मक्षयार्थ पूर्ववत् ८ पूजा व आठ दिवस एकेक भाताचे शीत खावेत. याप्रमाणे ६४ पूजा व ६४ उपवासादि भोजन क्रिया झाल्यानंतर या व्रताचे उद्यापन करावें. त्यावेळीं पंचवर्णानीं ६४ ‘दलाचें यंत्र काढून त्यांत सिद्धप्रतिमा स्थापून श्रीसिद्धपरमेष्ठी विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघांस चतुर्विधदानें द्यावीत. आठ मुनीश्वरांना, आर्थिकांना आहारदान देऊन आवश्यक पुस्तकें, कमंडलु, पिंछी वगैरे वस्तूं बाव्यांत, मंदिरांत जयधंटा, चामर, छत्र, धूपारति, पीठ इत्यादि उपकरणे ठेवावींत. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.