व्रतविधि-आषाढ महिन्यांतील नंदीश्वर पर्वांत शुद्ध ८ दिवशीं या व्रत ग्राहकांनीं शुद्धोदकांनें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र धारण करावीत. सर्व पूजा द्रव्यें हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदि- रास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चंद्रप्रभ तीर्थकर प्रतिमा अजित यक्ष ज्वालामालिनी यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष यक्षी, ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें. ॐ नहीं श्रीं कीं ऐं अई चंद्रप्रभतीर्थकराय अजितयक्षज्वालामालिनी यक्षी- सहिताय नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें १०८ फुळे घालावीत. तीर्थकर चरित्र वाचून ही व्रतकथाही वाचावी, नंतर एक मद्दार्थ करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. या क्रमानें चार महिने नित्यपूजा करावी. मात्र प्रत्येक अष्टमी व चतु- देशी दिनीं पांच प्रकारचे चरू करून अर्पण करावेत. एकाशन करावें अगर एकमुक्ति करावी. (एकच कोणतीहि वस्तु खाणे याला एकाशन आणि एकवेळ सर्व कांहीं खाणें यास एकभुक्ति म्हणतात.) शेवटीं कार्तिक पौर्णिमेचा दिवशीं चंद्रप्रभ तीर्थकर यांचा यक्षयक्षीसह महा- मिषेक पूजाभिषेक करावा. चोवीस पीटाच्या पोळ्या, २४ तेलाच्या पोळ्या, २४ करंजा, २४ लाडू (मंडकी), २४ कडाकण्या, सेवायांचे पायत हीं पकानें तयार करून २४ चरू तयार करून त्यांतून तीर्थकर देवांस पांच ५, श्रुतदेवीस ६, आचार्यास ३, पद्मावतीस २, रोहिणी- देवसि २, ज्वालामालिनीस ५, ब्रम्हदेवांस १ याप्रमाणें नैवेद्य अर्पण करावें. एकध्वज उभा करावा. तीन मुनीश्वरांस आहारदान देऊन शास्त्रादि आवश्यक वस्तु द्याव्यात. हाच उद्यापनाचा क्रम होय.
हें व्रत जे भव्य स्त्रीपुरुष गुरुसन्निध घेऊन भक्तीनें त्रिकरण शुद्धिपूर्वक आणि कृत, कारित, अनुमोदित यांनीं करतात; त्यांस उत्तम पुण्यबंध पडतो. त्यांची अनेक विध्नें आणि व्याधि दूर होतात. त्यांना भोगोपभोग इहपरलोकीं सुखे मिळून क्रमानें मोक्षसुखहि प्राप्त होतें. पहा-पूर्वी निर्नामिका स्त्रीनें हैं व्रत पाळून ती श्रीमती नामक राजकन्या झाली. एक दुर्गंधी नांवाच्या स्त्रीनें आपल्या पूर्व भवांत हें व्रत केलें म्हणून ती स्त्रीलिंग छेदून देव झाली. व पुढें चक्रवर्ति राजा झाली. मरुभूति राजानें पूर्वभवीं हैं व्रत केले होतें म्हणून पुण्योदयानें तो पुढें आपल्या दहाव्या मवांमध्ये पार्श्वनाथ तीर्थकर झाला. आणि कमठाचा भयंकर उपसर्ग सहन करून मोक्षास गेला. मग तेथे अक्षय- सुख अनुभवू लागला. असा या मोक्षलक्ष्मीनिवास व्रताचा महिमा आहे.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|