व्रतविधि- आषाढ शु. अष्टमी दिवशी या व्रतिकांनी प्रभाती सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून आपल्या अंगावर दृढधौत बर्षे धारण करावीत. पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जायें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मग पीठावर चंद्रनाथ प्रतिमा अजित यक्ष व ज्वालामालिनी यक्षीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. त्यांची अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचें अर्चन करावें. ॐ हीं श्रीं कीं ऐं अई श्रीचंद्रमभ तीर्थकराय अजितयक्ष ज्वालामालिनी यक्षी- सहिताय नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावीत. व्रतकथा वाचावी. सेवायांचे पायास, खव्याची बरफी दुग्धलाडू (मंडगी) पुरणाचे कानवले, करंजा यांचीं तीन तरी नैवेद्ये करून अर्पण करावीत. एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालुन मंगळारती करावी. देवापुढें नंदादीप लावावा, उपवास, एकाशन, एक- भुक्ति यांपैकीं शक्त्यनुसार करावें- ब्रम्हचर्य पाळावें. याप्रमाणे चौदा अष्टमी दिनीं पूजाक्रम करावा. या व्रताचें निराळे उद्यापन विधी नाहीं. म्हणून शेवटीं चतुर्विध संघास चतुर्विध शक्तिप्रमाणें दान द्यावें. असा याचा पूर्ण विधी आहे.
– कथा –
या जंबू द्वीपांतील भरत क्षेत्रांमध्यें भूषण नांवाचा एक विशाल व मनोहर देश आहे. त्यांत भूतिलक नांवाचें एक सुंदर शहर आहे.
तेथे पूर्वी बजसेन नांवाचा मोठा पराक्रमी व गुणशाळी असा राजा राज्य करीत होता. त्याला भूपणा नामक अति सुंदर, रूपवती व गुणवती पहराणी होती. हे दोघे सुखानें राज्यवैभवांत आपढ़ें आयुष्य कमीत असतां, एके दिवशी त्या नगराच्या बाहेर सौंधर नामक उद्यानांत देवचंद्र व वरचंद्र या नांवांचे दोघे अवधिज्ञानी चारणमुनि गगनमार्गे येऊन उत्तरले. त्या बनांत त्यांच्या आगमनानें सर्व वृक्ष फळे, पुष्वें, पल्लवें यांनी अत्यंत भरित होऊन शोभवंत दिसूं लागले हें पाहून तेथील वनपालक आश्चर्यचकित होऊन कांहीं सुंदर फलपुष्पें घेऊन राजसभेत गेला आणि तीं राजापुढें ठेऊन मोठ्या आदरानें दोन्ही हात बिनयानें जोडून राजांस म्हणू लागला कीं; – हे राजाधिराज ! आपलें शुभ भाग्य आज उद्यास आले आहे. कारण आज आपल्या सौंधर उद्यानांत दोघे चारणऋद्धिधारक महामुनी येऊन अवतरले आहेत. हॅ शुभवृत्त ऐकतांच राजास अत्यंत आनंद झाला. तो तत्काल सिंहासना- बरून उत्तरून ते मुनीश्वर ज्या दिशेस होते त्या दिशेकडे सात पाऊलें (सप्तपदें) चालत जाऊन मोठ्या नम्रतेनें परोक्ष नमस्कार करता झाला, आणि आपल्या अंगावरील वस्त्राभूषणें वनपालकास देतां झाला. मग सेवकांकडून सर्व नगरांत आनंदमेरी देववून सर्वपरिजन पुरजन यांच्या सह बर्तमान तो त्या मुनीश्वरांच्या दर्शनास पादमार्गे उद्यानास गेला. मुनी- श्वरांना तीन प्रदक्षिणा देऊन मोठ्या भक्तीनें वंदना, पूजादि करून त्यांच्या समीप जाऊन बसला. नंतर त्यांच्या मुखें कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर राजाची पट्टस्त्री भूषणादेवी ही आपले दोन्ही हात जोडून विनयानें मुनींद्रांस म्हाणाली, भो महागुरो ! स्वामिन् ! सांप्रत मजला पुत्र संतान नाहीं. याचें कारण काय असावे ? हें निवेदन मला करावें. हे तिचें नम्र वचन ऐकून ते मुनीश म्हणाले, हे कन्ये ! तूं पूर्व भत्रांत’ कनकमाला’ व्रत पूर्ण रीतीनें पालन न करतां मध्येंच सोडून दिलेस. त्या कारणानें आतां तुला पुत्र संतानाचा अंतर पडला आहे.
यास्तव आतां के है ‘इंद्रध्वज’ मत श्रीगुरुजवळ अहण कर. आति त्याचे यथाविधी पूर्ण पालन कर. म्हणजे व्रतप्रभावाने तुला इंदासमान आह प्रभावशाली पुत्र होईल. आतां तुला या मताचा काळ व विधी यथास्थित सांगतो असें म्हणून त्यांनी सर्वविधी सांगितला.
हे ऐकून त्या सर्वांत मोठा आनंद झाला. मग भूषणादेवीने त्यांच्या चरणीं नमस्कार करून हे व्रत ग्रहण केले. नंतर सर्वजन त्या मुनीश्वरास नमस्कार करून नगरी परत आले. पुढे काळानुसार त्या भूषणादेवीनें हें व्रत पूर्ण पालन केले. त्यानंतर थोड्याच दिवसांत तिला गर्भ राहिला. नवमास पूर्ण होतांच इंद्रासमान सुंदर व प्रभावशाली पुत्र जन्मला. मग ह्या दोघांनी पुष्कळ काळपर्यंत राज्यवैभवाचा सुखाने अनुभव घेऊन परंपरेनें स्वर्ग व मोक्ष प्राप्त करून घेतले.