हे सर्व ऐकून तिला पश्चात्तापपूर्वक समाधान वाटलें. मग त्या निर्नामिकेनें त्या पिहितास्त्रव मुनीश्वरांस मोठ्या भक्तीनें प्रणिपात करून हें व्रत घेतलें, नंतर सर्व जन त्या मुनीश्वरांस प्रणाम करून आपल्या पाटली नगरांस परत आले. नंतर ती निर्नामिका तेथील भाविक, धनिक, व धार्मिक लोकांच्या सहायानें हैं व्रत यथाविधी पाळून त्याचे उद्यापन केलें. त्यायोगानें ती निर्नामिका पुष्कळ पुण्यसंचय करून अंतकाली सन्यासत्रिचीने मरूम बिलिंग छेदून लाँत महर्दिक देष झाली. तेथे पुष्कळ सुख भोगून आयुश्योती तेथून व्यवून या भरत क्षेत्रांतील आर्यखंडांत श्रेयांस झाला. आणि त्यानेंच श्री आदिनाथ तीर्थकरांस प्रथम आहार दिला. पुढे तो पुष्कळ काल राज्यैश्वर्य भोगून त्याच श्रीआदिनाथ तीर्थकरांच्या समवसरणांत दिगंबर दीक्षा घेऊन गणधर झाला. पुढे तो शुक्राच्यानाने सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गेला. तेथे तो सिद्धपरमेष्ठी होऊन अनंतकाल अनंतसुख अनुभं लागला. असे या व्रताचे माहाल्य आहे.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|