व्रतविधि-आश्विन कृ. ३० दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि कार्तिक शु. १ दिवशीं प्रातःकाळी सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पोठावर चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्ष, यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी मग आठहि अंगाची पूजा करावी. नंतर ॐ ह्रीं अर्हं निःशंकित-सम्यग्दर्शनांगाय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत आठ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारणा करावी. तीन दिवस ब्रह्मचर्य पाळावे.
याप्रमाणे हे व्रतपूजन महिन्यांतून दोन वेळा त्याच तिथीस करावें. अशा आठ पूजा झाल्यावर शेवटीं फाल्गुन अष्टान्हिकांत याचे उद्यापन करावें. त्यावेळीं शिखरजी विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. एका मिथुनास भोजन करवून त्यांचा वस्त्रादि-कांनीं सन्मान करात्रा. असा पूर्णविधि आहे.
हे सम्यग्दर्शनाचे निःशंकितांग अंजन चोराने मोठ्या श्रद्धेने पालन केल्यामुळे त्याला सद्गति प्राप्त झाली आहे. असा याचा दृष्टांत आहे.
कथा-श्रेणिकमहाराजा व चलनामहाराणी यांचौच कथा येथे घ्यावी.