गर्भिणी जियांनी एकमुक्ति करावी. बाळंतीण असल्यास एकाशन करावें. वंच्या स्त्रियांनीं उपवास करावा. या क्रमाने चार महिन्यांतून आठ अष्टमी दिवशी पूजा व उपवासादि करावें. नंतर पुढे येणाऱ्या अष्टान्छि- कांतील अष्टमी दिवशी पार्श्वनाथ विधान करून याचें उद्यापन करावें. तेव्हां १२ बारा वेळत्राच्या करंड्या आणून त्यांत छडग्या सेवाया, थाळी- पिटें, करंजा, कडाकण्या, इक्षुखंड (उसाच्या कांड्या) पार्ने, फुलें, सुपाऱ्या, केळीं हे पदार्थ घालून त्याच्या वरती तेलाच्या पोळ्या झांका- व्यात. त्यांतून पार्श्वनाथा पुढे एक, पद्मावती, रोहिणीदेवी, श्रुतदेवी, गुरु यांच्यापुढें एकेक ठेवावें. कथा सांगणारा-पुरोहितास-एक द्यावें. नंतर सुत्रासिनी स्त्रियांस देऊन आपण घरी दोन घेऊन जावे. असा या व्रताचा पूर्ण विधी आहे.
पुढे त्या पांड्यचक्रवर्तीनें एकदां आपली कन्या उपवर झाली आहे असे पाहून राजसमेत सर्व मंत्रीजनांस पाचारून आपल्या कन्येस कोठें द्यावें याविषयी आपला सर्व विचार त्यांच्यापुढें मांडिला. तेव्हां सर्व मंत्रीमंडळींनी अनेक प्रकारें चर्चा करून असा निर्णय दिला कीं, देवसेन महाराज हे आपले सहोदर जामात आहेत. ते धीर, बीर, धर्मज्ञ, सम्यग्दृष्टी असल्याने आपल्या धर्मशील कन्येस वरण्यास अत्यंत योग्य अहेत. नंतर सर्वानुमतें चक्रवर्तीनें आपली कन्या देवसेन राजास मोठ्या समारंभानें विवाह करून दिली. मग ते देवसेन राजे आपल्या प्रिय युवतीसह आपल्या राजधानीस परत गेले. तेथे गेल्यावर ते अनेक राज्यैश्वर्यात, सद्धर्ममार्गात आपले आयुष्य मोठ्या आनंदानें घालवू लागले.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|