व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ शु. ७ दिनीं एकभुक्ति आणि ८ दिवशीं उपवास, पूजा वगैरे-पात्रांत पांव पार्ने मांडणे, णमोकार मंत्राचे जप पांच करणे, पांच मिथुनांस भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनीं सन्मान करणे.
हैं व्रत पूर्वी देवसेन राजा व त्याची देवमती राणी होती. त्यांना देवकुमार पुत्र होता. त्याचो देवमणी म्हणून एक सुंदर स्त्री होती. यांनीं एकदां यशोधराचार्य मुनीश्वरांजवळ हे व्रत घेऊन त्यांचे यथा-विधि पालन केले. त्यायोगे त्यांनी स्वर्ग व क्रमाने अपवर्ग यांचे सुख मिळविलें, असा दृष्टांत आहे.