व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक – ज्येष्ठ कृ. ९ दिनीं एकभुक्ति आणि १० दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत पाने २ लावणे, णमोकार मंत्राचे जप दोन करणे, दोन दंपतींत भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे.
-कथा-
पूर्वी-संगीतपुर नगरांत्र संगमित्र राजा सुगंधादेवी पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना संगीतगोष्टी नामे पुत्र व सुमंगलादेवी सून होती. शिवाय सुगुणाचार्य पुरोहित व त्याचो भार्या गुणवंती, पूर्ण-दत्त श्रेष्ठी व त्याची पत्नि पूर्णदत्ता, असा परिवार होता, एकदां त्यांनीं भानुदत्ताचार्य मुनींद्राजवळ हे व्रत घेऊन त्याचे यथाविधि पालन केले. त्यामुळे त्यांना स्वर्ग व क्राने मोक्ष प्राप्त झाले आहे. असा दृष्टांत आहे.