व्रतविधी – श्रावण शु० १ पासून कार्तिक शु० १५ पर्यंत जिनमंदिरांत प्रति दिवशीं जाऊन पार्श्वनाथ तीर्थकरास घरणेंद्र यक्ष व पद्मावती यक्षीसह पंचामृताभिषेकपूजा करावी, अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. पुढील मंत्राने १०८ पुप्पें घालावींत व्रतकथा वाचावी. पायम व तूप यांचे चरू अर्पण करावेत. या अवधींत येणाऱ्या अष्टमी आणि चतुर्दशींच्या दिवशीं पूर्ववत्च अभिषेक पूजा करून पांच घृतयुक्त पायस चरू करावेत. त्यादिवशी उपवास अगर एकासन अथवा एकमुक्ति करावी. ब्रम्हचर्य अवश्य पाळावें, शेवटीं उद्या- पन करावें. त्यावेळीं महाभिषेक विधिपूर्वक पार्श्वनाथ तीर्थकरांचा धरणेंद्र यक्ष व पद्मावती यक्षीसह पंचामृतांनी अभिषेक करावा. एका ताटांत रत्नत्रयाचें यंत्र काढून एकशेर उडीदांचा पुंज करून त्यावर दुधानें भरलेला एक कुंभ सुशोभित करून ठेवावा. त्यावर तें यंत्र ताट ठेवून ती प्रतिमा स्थापावी. अष्टविधार्चन करून पांच प्रकारचा पायसांचे पांच चरू करावेत. सोन्याचीं तीन व चांदीची तीन फुलें ही तीन रत्नेंच समजून रत्नत्रयास अर्पण करावीत. (रत्नें मिळाल्यास उत्तमच आहे.) सुगंधी द्रव्यांचें चूर्ण ” ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अई सुगंध- बंधुराय पार्श्वनाथाय धरणेंद्र यक्ष पद्मावती यक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रानें ३० वेळां अर्पण करावें. मग पुनः ह्याच मंत्रानें ३० घारग्या (पुऱ्या) ३० पोळ्या, ३० करंज्या, ३० फलें, ३० सुपाऱ्या, ३० पानें, ही घेऊन ३० वेळां अर्चना करावी. नंतर श्रुत, गुरु यांची पूजा यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचें अर्चन करावें. वरील मंत्रानेंच १०८ पुष्पें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. सुपारी, भिजावण्या, हळद कुंकू खारीक आणि पूर्वोक्त ( वरती ) सांगितलेल्या द्रव्यांची गंधाक्षतासह तीन वायनें करून
त्यांतून देवास एक, सरस्वतीपुढें एक ठेवून एक आपण घ्यावें. एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगला- रती करावी. घरी जाऊन चतुः संघास ऐपतीप्रमाणें चतुर्विध दानें द्यावीत. नंतर आपण पारणे करावें. असा याचा पूर्ण विधी आहे.
कथा
या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत अवंती नांत्राचा एक विशाल देश आहे. त्यांत उज्जयनीपूर नांत्रचे मनोहर शहर आहे. तेथे पूर्वी रत्नपाल भद्रपरिणामी गुणवान् राजा राज्य करीत होता. त्याला रत्नमाला नाम्नी एक रूपत्रती स्त्री होती. हे दोघे सुखानें कालक्रमण करीत असतां, एकदां त्या नगराच्या उद्यानांत रत्नसागर निश्रेथ भट्टारक महामुनि महाराज येऊन उतरले. तेव्हां ही शुभवार्ता वनपाल- द्वारे राजास कळली. त्यावेळी तो आपल्या प्रियधर्मपत्नी व परिवारजन यांच्यासह त्या मुनीश्वरांच्या दर्शनास गेला. तेथे जाऊन मोठ्या विनयानें त्यांना तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार व पूजा करून त्यांच्या समीप बसला. मग त्यांच्या मुखें धर्मोपदेश एक चित्ताने ऐकल्यावर त्यांची धर्मपत्नी रत्नमाला ही विनयानें दोन्ही हात जोडून मुनीश्वरांना म्हणाली, हे संसारसिंधुतारक महास्वामिन् ! आपण मला सर्व सुखाला कारणीभूत असे एकादें व्रत द्यावें. ही तिची नम्र प्रार्थना ऐकून ते महामुनि म्हणाले, हे भव्यशिरोमणे कन्ये ! तूं ‘ सुगंधबंधुर’ हे व्रत यथाविधी पालन कर, म्हणजे तुला इष्टसुखाची प्राप्ति होईल. असें म्हणून त्यांनी त्याचा सर्व विधी सांगितला, तें ऐकून त्यांना अगदी संतोष झाला. मग राणीनें नमोस्तु करून भक्तीनें हे व्रत घेतलें. नंतर सर्व जन पुनः पुनः नमस्कार करून नगरी परत आले. पुढे काळानुसार हे व्रत त्या रत्नमाला राणीनें विधिपूर्वक पालन करून त्याचे उद्यापन केलें. पुढे आयुष्यांतीं ती मरण पावून त्या व्रत महिमेनें स्वर्गादि सुखें भोगून स्त्रीलिंग छेदून क्रमानें मोक्षास गेली आहे.