व्रतविधि – वरीलपमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ कृ. ११ दिनीं एकमुक्ति आणि १२ दिवशी उपवास, पूजा वगैरे. पात्रांत चार पार्ने मांडणें, णमोकार मंत्राचे चार जप करणे, चार दंप तीस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे.
– कथा –
पूर्वी सिंधुपूर नगरांत सिंधुसेन राजा सिंधुदेवी पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांनग सिधुकुमार पुत्र व सिंधुसेना सून होती. त्याशिवाय सिंधुमति मंत्री व त्याचो मार्था सिंधुमुखी, सिंधुकेतू पुरो’हेत व त्याची स्त्री सिंधुशीला, सिंधुदत्त श्रेष्ठी व त्याची पत्नि सिंधुदत्ता असा परिवार होता. एकदां या सवीनों सिंधुसागर मुनिवर्याजवळ हे व्रत ग्रहण करून त्याचे पालन केले त्यामुळे त्यांना स्वर्गसुख व क्रपाने मुक्तिसौख्य मिळाले आहे. असा दृष्टांत आहे.