व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ कृ. १३ दिवशी एकमुक्ति आणि १४ दिनीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत एक पान लावणे, एका दंपतीस मोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे ९ नऊ पूजा झाल्यावर उद्यापन करणे. एका मुनींस, पुस्तक शास्त्र, जपमाळा देणें.
– कथा –
पूर्वी सरापूर नगरांत शूरसेन राजा सुकांत पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना रूपसुंदर पुत्र व रूपसुंदरी नामें सून होती.
शिवाय सुकौशल प्रधान व त्याची जी सुमति, सुरकीर्ति नामें पुरो-हित व त्याची भार्या सुरत्नमालिनी सुधोपदत्त श्रेष्ठो व त्याची पत्नि सुगुणी असा परिवार होता. एकदां या सर्वांनी सुगुप्ताचार्य नामें गुरूजवळ है व्रत ग्रहण करून त्याचे यथाविधि पालन केले. त्यायोगें त्यांना स्वर्ग व क्रमाने अपवर्ग सुख मिळाले आहे असा दृष्टांत आहे.