व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ कृ. ३० दिनीं एकभुक्ति आणि आषाढ शु. १ दिवशीं उपवास व पूना बौगैरे करणे, पात्रांत तीन पार्ने लावणे, तीन मिथुनांस मोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करावा. तीन मुनींना शास्त्र, जपमाळा देणे.
– कथा –पूर्वी रत्नपूर नगरांत रत्ननाथ राजा रत्नावली राणीसह राज्य करीत होता. त्यांना रत्नशेखर नामक पुत्र आणि रत्नमाला नामे सून होती. रत्नमभ मंत्री व त्याची स्त्री रत्नमती, रत्नचूल पुरोहित व त्याची भार्या रत्नसुंदरी, रत्नदत्त श्रेष्ठी व त्याची पत्नि रत्नदत्ता, रत्नंजय सेनापति त्याचो गृहिणी रत्नभूषणा असा त्याचा परिवार होता. या सर्वांनीं एकदां रत्नसागर मुनीश्वरांजवळ हे व्रत स्वीकारून त्याचे पालन केलें. त्यामुळे त्यांना स्त्रर्ग आणि क्रमाने मोक्ष मिळाला आहे. असा याचा दृष्टांत आहे.