व्रतविधि – वरीलपमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-आषाढ शु. ३ दिनों एकमुक्ति आणि ४ दिवशी उपवास, पूजा वगैरे पात्रांत सहा पार्ने लावणे, सदा दंपतीत भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सम्मान करणे, जिनबिंब, जिनालय, जिनपूजा, तीर्थयात्रा, दान, शास्त्र-लेखन, प्रतिष्ठामहोत्सव या सप्तक्षेत्रांत धन खर्चणे, सहा मुनींना शास्त्र जपभाळादि देणे.
– कथा-
पूर्वी सुरम्य नगरांत सुरेंद्र राजा सुरमा राणीसह राज्य करीत होता. त्यांना मदन नामक पुत्र व सुरवाहन मंत्री व त्याची स्त्री सुमती तसेच पुरोहित, श्रेष्ठी, सेनापति वगैरे परिवार होता. त्यांनीं एकदां सुमतिसागर नामक महानुनीजवळ है व्रत ग्रहण करून त्याचे यथा-योग्य पालन केले. त्यायोगे त्यांना स्वर्गाची व क्रमाने अपवर्गाची संपाच मिळाली आहे. असा दृष्टांत आहे.