व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-आषाढ शु ६ दिनीं एकमक्ति आणि ७ दिवशी उपवास पूजा वगैरे करणे, पात्रांत पार्ने ९ नऊ लावणे, नऊ मुनींना शास्त्र, जपमाळादि देणे, नऊ दंपतींना भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे.
-कथा-
पूर्वी नित्यावलोक नगरांत नित्यानद राजा नीतिवती राणी-सह राज्य करीत होता. त्यांना नीतिनिपुण पुत्र व निर्मला सून होती. शिवाय नीतिवंत मंत्री व त्याची स्त्री नीतिचतुरी, नीतिचारु श्रेष्ठी व त्याची पत्नि नीतिपालिनी, नीतिंजय सेनापत्ति व त्याची मार्था नीतिसुंदरी, नीतिकीर्ति पुरोहित व त्याचो गृहिणी नीतिसेना असा परिवार होता. त्यांनीं एकदां नीति जागर मुनीश्वरांजवळ हे व्रत घेऊन त्याचे यथायोग्य पालन केले. त्यायोगें ते स्वर्गास व क्रमाने मोक्षास गेले आहेत. असा दृष्टांत आहे.