व्रतविधि-वरील ममाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक -आषाढ शु. ७ दिनीं एकभुक्ति आणि ८ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत पान दहा लावणे, दहा मुनींना शास्त्र, जपमाळादि देणे. १० दंपतींना भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे. १०८ फलें, फुळे आणि चैत्यालय वंदना करणे.
– कथा –
पूर्वी अश्वपुर नगरांत अश्वत्थामा राजा अश्वगामिनी राणीसह राज्य करीत होता. त्यांना अश्वहरी पुत्र व अभ्वकांता सून होती. तसेंच अश्वकीर्ति पुरोहित व त्याची भार्या अश्वसेना, सेनापति मंत्री, राजश्रेष्ठी वगैरे परिवार होता. एकदां यांनीं विश्वसागर मुनीश्वरांच्या सन्निध हैं व्रत घेऊन त्याचे यथोचित पालन केलें. त्यामुळे ते स्वर्गास व क्रमाने मुक्तीस गेले आहेत. असा दृष्टांत आहे.