व्रतविधि-वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-आषाढ शु. ८ दिनीं एकभुक्ति आणि ९ दिवशी उपवास पूजा वगैरे. पात्रांत ११ पाने लावणे, ११ मुनींना शास्त्रादि आवश्यक वस्तूं देणें. ११ मिथुनांस भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनीं सन्मान करणे. १०८ कमलपुष्पें, १०८ आम्र फले, १०८ चैत्यालयांची वंदना करणे.
– कथा –
पूर्वी शिवमंदीरपूर नगरांत शिवसेन राजा शिवमती राणीसह राज्य करीत होता. त्यांना शिवकोन पुत्र व त्याची भार्या शिवगामी, शिवसंयोग मंत्री व त्याची स्त्री शिवशीला, तसेच श्रेष्ठी, पुरोहित सेनापति वगैरे परिवार होता. एकदां यांनी शिवगुप्ताचार्य गुरुजवळ हे व्रत ग्रहण करून त्याचे यथाविधि पालन केले. त्यामुळे ते स्वर्गास व क्रमाने मोक्षास गेले आहेत. असा दृष्टांत आहे.