व्रतविधि – आषाढ शु. १२ दिनीं या व्रत धारकांनीं एकभुक्ति करावी आणि १३ दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्त्रे धारण करावींत, सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिना-लयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन इर्यापथशुद्धिपूर्वक जिर्ने-द्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. देवापुढे एका पाटावर पांच पार्ने क्रमाने मांडून त्यांवर अक्षता, फलें, फुले, चरु वगैरे लावावेत. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यश्नी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं ह्र: अर्ह-त्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ सुगंधी पुष्र्षे घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत एक पान व त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावे. त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रद-क्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारणे करावें. तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा. देवापुढे नंदादीप लावावा.
याप्रमाणे पक्षांतून एकदां त्याच तिथीस पूजा करावी. नित्य क्षीराभिषेक करावा. अशा नऊ पूजा पूर्ण झाल्यावर कार्तिकांत नंदीश्वर पर्वांत याचे उद्यापन करावें. त्यावेळीं पंचपरमेष्ठी विधान करून महाभि-बेरु करावा. चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावींत. एका मुनीश्वरांस शास्त्रादि आवश्यक वस्तू द्याव्यात. एका दंपतीस भोजन करवून वस्त्रा-दिकांनी त्यांचा सन्मान करावा. एकशें आठ आंबे, केळीं अर्पण करावींत. १०८ कमल पुष्पे वहावींत. १०८ जिनचैत्यालयांची वंदना क.रात्री. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
– कथा –
पूर्वी गंगापूर नगरांत गंगासेन नामक राजा आपल्या गंगादेवी पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना गंगाधर नांवाचा पुत्र व गंगाभित्रा नामें सून होती तसेच गंगादेव मंत्री व त्याची स्त्री गंगामती असून पुरोहित, श्रेष्ठी, सेनापति इत्यादि परिवार होता. एकदां यांनीं गंगासागर नामक मुनीजवळ हे व्रत ग्रहण करून त्याचे यथायोग्य पालन केलें त्यामुळे ते स्वर्गास व क्रमाने मोक्षास गेले आहेत. असा दृष्टांत आहे.