पुढें ती पद्मावती आपल्या आयुष्यवसांनी मरण पावून एका गणी- केच्या उदरी’ सर्वप्रिया’ या नांवाची गणिका होऊन जन्मली. नंतर कांहीं दिवसांनी ती वसंतमाला स्त्री आपल्या आयुष्यांती संन्यास विधीनें मृत्यु पावून त्याच नगरी भानुदत्त नामें राजश्रेष्ठी होता, त्याची स्त्री जी लक्ष्मीमती तिचे उदरी कुमारकांत नांवाचा मुलगा होऊन जन्मली. आणि तो कोष्टी मरून त्या वसंतमालेनें दिलेल्या व्रतांतील अष्टमांश पुण्यानें त्याच नगरी असलेल्या नंदिवर्धन वैश्य व त्याची त्री नंदिवर्धिनी यांच्या पोटीं कनकमाळा नांवाची कन्या होऊन जन्मला. मग पुढें तो श्रेष्ठिपुत्र कुमारकांत तरुणावस्येंत आल्यावर त्याचा त्या कनकमाला कन्येशीं शुभदिनीं सुमुहूर्तावर विवाह झाला. मग ती दंपति नाना मोगोपभोगांचा अनुभव घेत असतां, एके दिवशी विमलबोध नामें महादिव्यज्ञानी मुनीश्वर त्या नगराच्या उद्यान वनांत येऊन उतरले. ही ‘शुभवार्ता राजास कळतांच तोः प्रतापसिंह राजा आपके परिजन व पुरजन यांसह पादमार्गानें त्या वनांत गेला. तेथे गेल्यावर भक्तीनें तीन प्रदक्षिणा घालून पूजा, वंदनादि करून त्यांच्या समीप धर्मश्रवण करण्या- साठीं जाऊन बसला. कांहीं वेळ शांतवृत्तीनें धर्मोपदेश ऐकल्यावर तो कुमारकांत आपले दोन्ही हात जोडून त्या मुनींद्रास विनयाने म्हणाला, – भो महामुनींद्र ! या भावामध्ये ह्या कनकमाला कांतेवर माझा इतका अतिस्नेह उत्पन्न होण्याचे कारण काय? हे मला यथार्थ सांगावें. हे त्याचे नम्र वचन ऐकून ते मुनि त्यास म्हणाले, ही तुझी कनकमाला स्त्री पूर्वमत्रांत कोष्टी होती. त्याला तूं आपल्या व्रतांतील अष्टमांश पुण्य दिल्यामुळे या भवांत तो तुझी कांता झाला आहे. या कारणानें तुझा तिच्यावर अतिशय स्नेह होत आहे. व राजाची पट्टराणी जी पद्मावती ती पापोदयानें वेश्या झाली आहे. हे वृत्त मुनिमुखें ऐकतांच तेथील सर्व जनांस पूर्वभवांचे स्मरण झाले. तेव्हां त्यांच्या मनांत पूर्ण सम्यक्त्व उत्पन्न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा तें हैं व्रत गुरूंच्या सन्निध ग्रहण केलें. नंतर सर्वजन घरी आल्यावर समयानुसार त्यांनी हें व्रत यथाविधी पाळून त्याचे उद्यापन केलें. ती गणिकाहि पंचाणुव्रतें मुनीजवळ घेऊन निरतिचार पाळू लागली. पुढे आयुष्यांतीं ती गणिका संन्यासविधीनें मृत्यु पावून त्रीलिंग छेदून सौधर्म कल्पांत अमरेंद्र झाली. तो कुमारकांत आणि ती कनकमाला ही दंपत्ती आपले आयुष्य पूर्ण होतांच समाधि विधीनें मरण पावून अच्युत कल्पांत इंद्र व प्रतिइंद्र देव अनुक्रमें होऊन तेथील सुख भोगूं लागली.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|