व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक–आषाढ शु. ११ दिनीं एकभुक्ति व कृ दिवशी उपवास, पूजा वगैरे. पात्रांत पार्ने चार लावणे, चार मुनींद्रांस शास्त्रादि दान देणे, चार मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे, १०८ फले, कमलपुष्पें, वाहाणे व जिनमंदिर दर्शन करणे वगैरे.
– कथा –
पूर्वी पीतपूर नगरांत पीतप्रभ राजा पीतमहादेवी पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना पीतमंदर पुत्र व त्याची पीतसुंदरी पत्नि शिवाय पीतपालक मंत्री व त्याची स्त्री पीतगुणिनी, पीतकीर्ति पुरोहित व त्याचो भार्या पीतवदना तसेच श्रेष्ठो, सेनापति इत्यादि परिव’र होता. एकदां यांसह राजा पीदसागर गुरूंच्या दर्शनास गेला होता. त्यावेळीं राजा व राणी यांनी है व्रत घेऊन त्याचे यथायोग्य पालन केले. त्यामुळे त्यांना स्वर्गसुख व क्रमाने मोक्षसुख मिळाले आहे. असा दृष्टांत आहे.