व्रतविधि-वरीलप्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक आषाढ कृ. ३ दिनीं एक्कमुक्ति व ४ दिवशी उपवास, पूजा वगैरे. आठ कराव्यात पात्रांत पार्ने सात लावणे, सात मुनींद्रांस शास्त्र, जपमाळादि देणे, सात दंपतींस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे, १०८ कमलपुष्पें आंबे, केळी अर्पण करणे, १०८ जिनालयांची वंदना करणे वगैरे.
– कथा –
पूर्वी मयूरपूर नगरांत मयूरसेन राजा मयूरवदनी पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना मयूरकंठ पुत्र व मयूरकंठी सून होती. शिवाय मयूरग्रीव मंत्री व त्याचो पत्नि मयूरग्रीवी, मयूरकीर्ति पुरो-हित व त्याची मार्या मयूरसुंदरी, मयूरदत्त श्रेष्ठी व त्याची गृहिणी मयूरदत्ता, सेनापत्ति वगैरे परिवारजन होते. यांच्यासह एकदां राजा मयूरसागर मुनिवर्याचे दर्शनांस गेला होता. त्यावेळीं त्याने राणीसह हे व्रत त्यांच्याजवळ धारण केले व त्यांचे यथाविधि पालन केले. त्यायो-गार्ने त्यांना स्वर्गसंपदा आणि परंपरेने मोक्षसंपदा प्राप्त झाली आहे. असा दृष्टांत आहे