व्रतविधि- वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक -आषाढ कृ. ५ दिनीं एकमुक्ति आणि ६ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. आठ पूजा, पात्रांत दोन पार्ने लावणें, दोन मुनींना शास्त्र, जपमाळादि देगें, दोन दंपतीस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे, आंबें, कमलपुष्पें पूर्ववत् अर्पण करणे.
– कथा –
पूर्वी भानुपूर नगरांत भानुरथ राजा भानुमती राणीसह राज्य करीत होता. त्यांना भानुकुमार पुत्र व त्याचो मार्या मानुदेवी होती. शिवाय भानुद्योत मंत्री व त्याची स्नो भानुश्री, भानुकीर्ति पुरोहित व त्याची पत्नि भानुज्योति, भानुदत्त श्रेष्ठी व त्याची गृहिणी मानुदत्ता वगैरे परिवार होता. यांच्यासह राजा एकदां भानुप्रताप मुनीश्वरांच्या दर्शनास गेला होता. त्यावेळीं त्याने राणीसह है व्रत घेऊन त्याचे यथाविधि पालन केले. त्यामुळे त्यांना स्वर्गपुस्व व क्रमाने मोक्ष-सुख मिळाले आहे. असा दृष्टांत आहे.