व्रतविधि – वरीलप्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक-आषाढ कृ. ७ दिनीं एकमुक्ति व ८ दिवशी उपवास, पूजा वगैरे. आठ पूजा, पात्रांत चार पार्ने लावणे, चार मुनींना शास्त्रादि देणे, चार युगुलांस भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनीं सन्मान करणे, १०८ कमलपुष्पें, आम्रफलें अर्पण करणे वगैरे.
– कथा –
पूर्वी श्रीरंगपट्टण नगरांत श्रीरंग राजा श्रीरंगमहादेवी राणी-सह राज्य करीत असे. त्यांना श्रीरंगकुमार नामक पुत्र श्रीरमणो सून होती. शिवाय मंत्री, पुरोहित, श्रेष्ठी, सेनापति वैगैरे परिवार होता. यांच्यासह राजा एकदां श्रीषेण नामक मुनीश्वर्यांच्या दर्शनास गेला होता. त्यावेळीं त्यानें राणीसह है व्रत घेऊन त्याचे यथाविधि पालन केले. त्यामुळे त्यांना स्वर्ग व कमाने मोक्षमुख मिळाले आहे. असा दृष्टांत आहे.