व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविधि करावा, त्यांत फरक-आषाढ कृ. ८ दिनों एकभुक्ति आणि ९ दिवशी उपवास, पुजा वगैरे. आठ पूजा, पात्रांत पांच पाने लावणे, पांच मुनींना शास्त्रादि देणें, पांच दंपतीस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सम्मान करणे, १०८ कमलपुष्पें, आम्रफले अर्पण करणें बगैरे.
– कथा-
पूर्वी कमलापूर नगरांत कमलसेन राजा कमलसुंदरी राणीसह राज्य करीत होता. त्यांना कमळाकर नामे पुत्र व कमलावती सून होती. शिवाय मंत्रो, पुरोहित, श्रेष्ठी, सेनापति वैगैरे परिवार जन होते. यांच्यासह राजा एकदां कमलसागर मुनिमहाराजांच्या दर्शनास गेला होता. त्यावेळीं त्याने राणीसह है बत्र स्वीकारून त्याचे पालन यथोक्त केले. त्यामुळे ते स्वर्गास व क्रमाने मोक्षास गेलें आहेत. असा दृष्टांत आहे. /