व्रतविधि – आषाढ किंवा श्रवण महिन्यांत प्रथम जो सोमवार बेईल त्या दिवशीं या व्रतिकांनीं एकभुक्ति करावा. व दुसन्या दिवशीं [ मंगळवारी] प्रभातीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेद्रास भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. नंदादोप लावावा. पीठावर पंचपर-मेष्ठी प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. श्रुत व ‘गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षो व ब्रम्हदेव याचे अर्चन करावें. ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं ह्र: अर्हत्सि-द्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां एक जप करावा. ही व्रतकथा वाचावी, देवापुढे भिजलेले हरमरे, उडीदाच्या घारग्या, कोड-बोळे, गूळ, खोबरे, करंजाचे चरु वगैरे ठेवावे. एका पात्रांत पांच पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावे. त्यानें ओवाळीत मंदिरास तोन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. सत्पात्रांस आहारदान द्यावं, त्या दिवशीं उपवास करावा अगर फलाहार करावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारणें करावें.