व्रतविधि-कार्तिक शु. ९ दिनीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. १० दिवशीं प्रातःकाळी शुचिजलाने अभ्यंग स्नान करून अंगावर दृढधौतवस्त्र धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठा-वर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांचो पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौ ह्र: अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप एक करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत पांच पार्ने व त्यांवर अष्ट-द्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्घ्य करावे व त्याने ओवाळीत मंदि-रास तीन प्रक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशीं उपवास करावा. सत्पत्रांत आहारदान द्यावें. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारणे करावे
-याप्रमाणें महिन्यांतून एकदां त्याच तिथीस पूजाक्रम करावा. अशा पांच पूजा पूर्ण झाल्यावर फाल्गुन अष्टान्हिकांत शेवटीं याचें उद्यापन करावें, त्यावेळीं पंचपरमेष्ठीविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विधदानें द्यावींत.. असा याचा पूर्णत्रिधि आहे.
– कथा –
पूर्वी उज्जयिनी नगरामध्यें वीरसेन राजा आपल्या विजया-देवी पट्टराणीसह सुखानें राज्य करीत होता. त्यांना असुरकुमार नामक एक पुत्र त्याला सुरदेवी नामें मार्या होती. या शिवाय मंत्री, पुरोहित, श्रेष्ठी, सेनापत्ति वगैरे परिवारजन होते. यांच्यासह आनंदांत तो कालक्रमणकरीत असतां, एके दिवशीं मासोपवासी विद्यासागर नांवाचे मुनी-श्वर या नगरांत आहारानिमित्त आले. राजवाड्याजवळ येतांच राजाने त्याचे प्रतिग्रहण करून त्यांना पाकगृहांत नेलें. विधिपूर्वक नवधा भक्तोर्ने निरंतराय आहार दिला. मग ते एका आसनावर बसले असतां, -राजाने त्यांना प्रार्थना करून त्यांच्या जवळ एकादै व्रत मागितले तेव्हां त्यांनी त्याला करकुच व्रत देऊन त्याचा सर्वविधि सांगितला. नंतर ते मुनीश्वर सर्वांस आशिर्वाद देऊन वनांत निघून गेले. पुढे कालानुसार राजाने आपल्या सर्व परिवारजनांसह है व्रत यथाविधि पाळिले. त्या योगाने त्यांना स्वर्गाची व क्रमाने मोक्षाचो प्राप्ति झाली आहे. असा दृष्टांत आहे.