व्रतविधि– वरील प्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरकआश्विन मासांतील पहिल्या शनिवारीं एकभुक्ति आणि रविवारी उपवास, पूजा करावी. क्षेत्रपाल पूजा करतांना एका पाटावर पांच पार्ने मांडून त्यांवर अक्षता, फळे, पुष्पें, चरु, पांच खोब-याच्या वाट्या गुळासह आणि गुडमिश्रित पांच लाडू ठेवावेत. पंच क्षेत्रपालांची क्रमानें अर्चना करावी. पंचपकान्नांचे चरु करावेत. ॐ आं क्रों ह्रीं हूं फट् पंचमहाक्षेत्रपालदेवेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें (तांबडी कण्हेरी गुलाब) घालावीत. पांच रविवारी पूजा करून शेवटीं कार्तिक अष्टान्हिकांत उद्यापन करावे. पांच मुनींना आहार देऊन श्रुत्तपावड, पिंछी, कमंडलु वगैरे आवश्यक वस्तु द्याव्यात. तसेंच पांच आर्यिकांनाहि आहारदान व नूतन वस्त्र नेसण्यास द्यावें. व आवश्यक वस्तु हि द्याव्यांत, पांच मिथुनांस भोजन करवून नवीन वस्ने द्यार्थीत तांबूल, गंधाक्षता, सुपारी, फळे, नारळ, सार्द्रचणक, हळद,कुंकु, त्यांच्या ओठ्यात घालून त्यांचा आदर सत्कार करावा. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.आतां है व्रत पूर्वी ज्यांनी पालन करून सद्गति मिळविली आहे; त्यांची कथा सांगतों ऐका.
– कथा –
मिथिलापुर या नांवाचे एक नगर सुंदर आहे. तेथे पूर्वी जिनराय या नांवाचा एक पराक्रमी व गुणवान् असा राजा राज्य करीत होता. त्याला विदेही नामक एक सुंदर व लावण्यवती पट्टस्त्री होती. त्याला कनकमहाराज नामक एक बंधु असून त्याला कनकवती नांत्राची एक स्त्री होती. शिवाय मंत्री, पुरोहित, राजश्रेष्ठो वगैरे परिजन होते. या सर्वांसह तो जिनराय सुखाने कालक्रमण करीत असतां एके दिवशीं त्या नगराच्या उद्यानांत श्रीकनकप्रभ नामक निर्मथ महामुनीश्वर आपल्या संघासह येऊन उतरले. ही शुभ वार्ता वनपालकाच्या द्वारे त्याला कळतांच तो आपल्या सर्व परिजन, पुरजन यांच्यासह पादमार्ग मुनीश्वरांच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर मुनिसंघास तीन प्रदक्षिणा घालून त्याचें दर्शन, पूजन, स्तवन करून त्यांच्या समीप बसला. कांहीं वेळ त्यांच्या मुर्ख धर्मोपदेश ऐकल्यावर तो आपले दोन्ही हात जोडून नम्रतेनें त्यांना म्हणाला, हे दयासिंधो स्वामिन् ! आज आम्हांस सुखाला कारणीभूत असे एकादें व्रतविधान सांगावे. हे त्यांचे नम्र वचन ऐकून ते मुनीश्वर म्हणाले, हे मध्योत्तम राजन् ! आतां श्रीपंचमहाक्षेत्रपालव्रत हैं पालन करा; म्हणजे त्यायोगें तुम्हांस सर्व सुखे प्राप्त होतील; असे म्हणून त्या व्रताचा काल व विधि सर्व सांगितला. ते ऐकून त्यांना मोठा आनंद झाला. मग त्यांनीं त्या कनकप्रभ मुनिराजांस प्रार्थना करून ते व्रत ग्रहण केले. मग सर्वजन त्या मुनीश्वरांना नमस्कार करून आपल्या मिथिलापुरीं परत आले. पुढे योग्य कालीं ते व्रत त्यांनी पाळून त्याचे उद्यापन केले. त्यायोगानें तुम्हीं ते आयुष्यांती मरून स्वर्गात देव झाले आणि तेथे चिरकाल सुख भोगूं लागले. असा या व्रताचा दृष्टांत आहे.