व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-कार्तिक शुक्लपक्षांतील पहिल्ल्त्या बुधवारी एकभुक्ति आणि गुरुवारी उपवास, पूज्जा वगैरे. पंचपरमेष्ठींची आराधना झाल्यावर शेवटीं वास्तुकुमार, वायुकुमार, मेषकुमार, अग्निकुमार व नागकुमार यांचे क्रमाने एका पाटावर पांच पाने मांडून अर्चन करावें. याप्रमाणें पांच गुरुवारीं पांच पूजा पूर्ण झाल्यावर शेवटीं फाल्गुन अष्टान्डिकांत याचे उद्यापन करणे. पांच मुनि व आर्थिकां यांना आहारादि दाने तसेच पांच दंपतीस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे.
– कथा-
मंगलावती देशांत मंगलपुर नगर आहे. तेथे पूर्वी सुमंगल नामक एक सदाचारी, गुणवान्, शूर असा राजा राज्य करीत होता. त्याला मंगलादेवी या नांवाची एक रूपवती, सुशील अशी राणी होती. त्यांना जयमंगळ नामक पुत्र होता. त्याला जयावति नांवाची स्त्री होती. त्याचा विजयमंगळ नांवाचा प्रधान असून त्याला विजयावति नांवाची स्त्री होती. व विजयकीर्ति नांत्राचा पुरोहित असून त्याला गजगामिनी नामक स्त्री होती. आणखी विजयदत्त नामक राज-श्रेष्ठो असून त्याला यमुनादत्ता नांवाची स्त्री होती. या सर्व परिवारा-सह तो सुमंगल राजा सुखानें काल घालवीत असतां, – एके दिवशीं त्या नगराच्या बहिरुद्यानांत विजयसेन नांवाचे महामुनि संघासह येऊन उतरले. ही शुभवार्ता वनपालकाच्या द्वारे राजांस कळतांच तो आपलेसर्व परिवार जन व पुरजन यांच्यासह त्या मुनीश्वरांच्या दर्शनास पाद-मार्गे गेला. तेथे गेल्यावर त्या मुनीश्वरांस तो सीन पदक्षिणा देऊन बंद-नादि क्रिया करून त्यांच्यासमीप जाऊन बसला. त्यांच्या मुखाने कांही वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर तो मोठ्या विनयाने आपले दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाला, हे दयासिंधो स्वामिन् ! आज आम्हांस एकादें व्रतविधान सांगावे. हे त्यांचे माषण ऐकून त्यानी त्याला है व्रत देऊन विधिपूर्वक करण्यास सांगितले, ते ऐकून समस्त जनांस मोठा आनंद झाला. मग त्याने ते व्रत आपल्या राणीपह घेतले. पुनः सर्वजन त्या मुनीश्वरांना वंदना करून नगरी परत आले. पुढे सम-यानुसार त्यांनीं है बत यथाविधि पालन केले, त्या योगाने ते अंतीं समाधिविधीनें मरून स्वगर्गात देव होऊन जन्मले आणि तेथे चिरकाल स्वर्गीय दिव्य सुख भोगू लागले,