व्रतविधि – पौष शुक्लपक्षांतील पहिल्या शनिवारी या व्रतधार-कांनीं एकमुक्ति करावी. आणि रविवारीं प्रातःकाळी मासुक्क पाण्याने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवर्षे धारण करावींत. मग सर्व पूजा सामुग्री हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मग श्रीपीठावर पंचपरमेष्ठी प्रतिभा स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. नंदादीप लावावा. देवापुढे एका पाटावर १० स्वस्तिके काढून त्यांवर दहा पार्ने मांडावीत. आणि त्यांच्यावर अष्टद्रव्ये ठेवावर्वोत.
नमः नंतर श्री पंचपरमेष्ठींचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत त्यांची अष्ट-द्रव्यांनी पूजा करावी. पंचपकानांचीं नैवर्षे करावीत. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी, यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावे. मग दश-दिक्पालकांची पृथक पृथक अर्चा करून त्यांना बळी द्यावा. ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं ह्र: अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्वसाधुभ्यो स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुर्षे घालावींत णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून शास्त्र स्वाध्याय करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत दहा पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावे, त्यानें ओवाळीत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. शक्तीप्रमाणे उपवास अगर दहा वस्तूंनीं नियम करून आहार करावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावींत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणा करावा. तीन दिवस ब्रह्मचर्य पाळावे.
या प्रमाणें है व्रत पूजन दहा रविवारी करून शेवटीं त्याचे उद्यापन करावे. त्यावेळीं श्री पंचपरमेष्ठी विधान करून महाभिषेक करावा. शांति होम व जलहोम करून दशदिक्पालकांना बली द्यावा. चतुःसंघास आहारादि दाने द्यावीत. दहा दंपतीस भोजन करवून त्यांच्या ओट्यांत पान, सुपारी, तांबूल, फळे, पुष्प, सार्द्रचणक, हळद, कुंकु, केळी वगैरे घालून त्यांचा सन्मान करावा. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
आतां हैं व्रत पूर्वी विधिपूर्वक पालन केल्यामुळे ज्यांना सद्गति सुख प्राप्त झाले आहे. त्यांची कथा येथे सांगतों. ते तुम्ही एकाग्र-चित्तानें ऐका –
– कथा –
दशपूर नांवाचे एक सुंदर पट्टण आहे. तेथे पूर्वी दशचंद्र नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याला विलासवती नामक सुशील, रूपवती, गुणवती अशी राणी होती. त्यांना दशसिंह नांवाचा एक गुणवान् व सुंदर पुत्र होता. त्याला सिंहसेना नामक सुंदर स्रो होती. शिवाय, मंत्री, पुरोहित, राजश्रेष्ठी, सेनापति असे परिवारजन होते. यांच्यासह तो सुखाने कालक्रमण करीत असतां, – एके दिवशीं त्या पट्टणाच्या उद्यानांत देशभूषण नांवाचे महामुनि येऊन उतरलें, ही शुभवार्ता त्या राजास कळतांच तो आपल्या सर्वपरिवारजन व पुरजनांसह त्यांच्या दर्शनास पादपार्ने गेला. तेथे जाऊन त्यांना तीन प्रदक्षिणा पूर्वक वंदनादि करून त्यांच्यासमीप बसला. मग त्यांच्या मुखानें कांहीं वेळ धर्मोपदेश ऐकल्यावर ते आपलीं करकमले विनयाने जोडून त्यांना म्हणाले, – हे दय सिंधो ! स्वामिन् ! आतां आपण आम्हांत सर्व सुखाला कारण असे एकादे व्रतविधान सांगावें, हे त्याचे विनयपूर्ण वचन ऐकून ते महामुनिराज त्यांना म्हणाले – हे भव्योत्तम राजन् ! आतां तुम्ही दशदिक्पालकव्रत है पालन करा. म्हणजे तुम्हांस त्यायोगानें सर्व सुर्खे प्राप्त होतीऊ असे म्हणून त्यांनी त्या व्रताचा सर्वविधि निरूपण केला. ते ऐकून त्या सर्वांना मोठा संतोष झाला. मग त्या राजानें त्या मुनीश्वरांस भक्तीनें वंदना करून हे बा ग्रहण केलें. नंतर ते सर्वजनासह वंदना करून आपल्या नगरी परत आले. पुढे योग्यकालीं है व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केल्या-मुळे त्यांना संसार सुखे प्राप्त होऊन क्रमाने मुक्तिसुखही मिळाले आहे. असे या व्रताचे महात्म्य आहे.