व्रतविधि – फाल्गुन शु. ८ ते १५ पर्यंत आठ दिवस या व्रत-धारकांनी प्रातःकाळी सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ- धौत वखें धारण करावीत. मग सर्व पूजासामग्री इातीं घेऊन जिना- लयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा वाळून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियापूर्वक श्रीजिनेंद्रांस भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदा- दीप लावावा, श्रीपीठावर नंदीश्वरबिंय आणि चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्षयीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. आणि त्या प्रतिमा पंच मंदरवर स्थापून त्यांच्यापुढें एका पाटावर आठ स्वस्तिकें काढून त्यांवर आठ पानें मांडावीत. आणि त्यांच्यावर अष्टद्रव्ये ठेवावींत. नंतर त्यांची अष्टद्रव्यांनी सविस्तर पूजा करावी, पंचभक्ष्य पायसांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी, ब्रम्हदेव यांचे पूजन करावें. ॐ हीं अई चतुर्विंशतितीर्थक- रेभ्यो यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्रानें १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्त्रना- मस्तोत्र म्हणून शास्त्र स्वाध्याय करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत आठ पानें मांडून त्यावर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेऊन महार्थ्य करावें. आणि त्यानें ओवाळीत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी त्या आठ दिवसांत यथाशक्ति उपवास अगर धारणा पारणा अथवा एकमुक्ति किंवा कांजिकाहार वा आठ वस्तूंनी आहाराचा नियम करावा. आणि पौर्णिमेदिवशीं चतुर्विंशति तीर्थकराराधना करून महाभिषेक करादा. पंचपक्वान्नांचे [पंच भक्ष्य पायसांचे] चरु करावेत. पांच कलशांत पांच शेर तूप भरून देवांस अर्पावेत. चतुःसंघास चार प्रकारर्ची दानें बावींत. असा या व्रतांचा पूर्ण विधी आहे.
हे व्रत जे भव्य नरनारी यथाविधी पालन करून उद्यापन करतात त्यांना तीर्थकर पुण्यप्रकृतीचा बंध होतो. तसेच बलदेव, वासुदेव, अर्धचक्री पूर्णचक्री यांचे वैभव प्राप्त होते. आणि ते अंतीं जिनदीक्षा घेऊन घोर तपश्चर्येने सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास जातात. असा या व्रताचा प्रभाव आहे.