व्रतविधि-आषाढ शु. १० दिनीं या व्रतिकांनी एकसुक्ति -करावी आणि ११ दिवीं प्रातःकाळीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढघौतवने धारण करावी. सर्व पूजा द्रव्ये हाती घेऊन जिनालयास जावे, मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा, देवापुढे नंदादीप लावावा. पीठावर शीतलनाथ तीर्थकरांची पतिमा ईश्वरपक्ष वैरोटीयक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. एका पाटावर अकरा स्वस्तिके काढून त्यांवर पार्ने, अक्षता, फळे, फुके, नैवये वगैरे ठेवून अष्टद्रव्यांनी अभिषिक्त देवांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूआ करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ हीं श्रीं क्लीं में अई शीतलनाथाय ईश्वरयक्ष वैरोटीयश्रीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत, ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत अकत पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्यें, एक नारळ लावून महार्घ्य करावे. त्यांनी ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारजी कराथ. त्यादिवशी उपवास करून सत्पात्रास आहारादि दाने द्यावीत. अकरा ११ दंपतींना भोजन करवून वर्षे, फळे, फुलै, पान, अक्षता, तांदूळ वैगैरेनी त्यांचा सम्मान करावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारणे करावे. ब्रह्मचर्यपूर्वक धर्म-ध्यानांत काळ घालवावा. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या भरतक्षेत्रांत नंद्यापर्वत नांवाचे एक पट्टण आहे. तेथे नंदिषेण नामक एक धार्मिक, मोठा पराक्रमी राजा आपल्या नंदादेवी नामें पट्टराणीसह सुखाने राज्य करीत होता. एकदां पट्टणाच्या बाहेरील उद्यानांत नंदिषेण नांवाचे मुनीश्वर संघासहित आल्याचे वृत्तांत कळतांच हा आपल्या परिजन व पुरजन यांच्यासह त्यांच्या दर्शनास गेला. त्यावेळीं त्यांच्याजवळ है व्रत राजाने घेऊन त्याचे यथास्थित पालन केले. त्यामुळे ते स्वर्गास व क्रमाने मोक्षास गेले आहेत. असा या व्रताचा दृष्टांत आहे. कथा पूर्ववत्.