व्रतविधि – चैत्र शु. १३ दिवशीं या व्रतधारकांनीं एकभुक्ति करावी. १४ दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्रे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि-पूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर अनंतनाथ तीर्थकर प्रतिमा किन्नर यक्ष व अनंतमति यक्षीसइ स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर १४ स्वस्तिके काढून त्यांवर पाने, फुले, फळे अक्षता वगैरे ठेवून अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. श्रुत व गणधर पूजा करून चौदा मनूंम-पृथक पृथक अर्घ्य द्यावे. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचें अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं अनंतनाथतीर्थंकराय किन्नरयक्ष अनंतमतियक्षिसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां एक जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत १४ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्यें व एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिनीं उपवास करावा. सत्पात्रांस आहारदान द्यावे. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणा करावी. तीन दिवस ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा.
याप्रमाणे चौदा १४’ चतुर्दशीस पूजा करून शेवटीं याचे उद्यापन करावे, त्यावेळीं अनंतनाथतीर्थकर विधान करून महाभिषेक करावा, चतुःसंघास चतुर्विध दाने द्यावीत. १४ दंपतीस भोजन करवून तांबूल, वस्त्र, फल, पान, अक्षता, केळी, सुपारी वगैरेनी त्यांचा सन्मान करावा. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील पूर्वविदेह क्षेत्रांत पुष्कलावती नांवाचा एक विस्तीर्ण देश असून त्यांत पुंडरीकिणी नांवाचे एक पट्टण आहे. तेथे पूर्वी बज्रसेन नांवाचे तीर्थकर राजे राज्य करीत होते. त्यानां श्रीकांता नामें महाराणी होती. त्यांच्या उदरों वज्रनाभि नांवाचा ज्येष्ठ पुत्र होता. त्याच्याकडे सर्व राज्यभार देऊन वे दीक्षा घेऊन तीत्र तपश्चर्या करूं लागले. त्यायोगें ते घातिक्रर्माचा नाश करून केवळञ्ज्ञानी होऊन समवशरणीं विराजमान झाले. तेव्हां त्यांच्या समवशरणांत हे वज्रनाभि चक्रवर्ति महाराज षट्लंडाधिपति होऊन गेले. तेथे ते विधि-युक्त वंदनादि क्रिया करून मानवकोष्टांत जाऊन बसले. कांहीं दिव्य-ध्वनींतून धर्मोपदेश ऐकल्यानंतर गणधरांच्या मुर्ख श्रावकांची व्रते व हे चतुर्दशमनुव्रत ऐकून संतुष्ट झाले. मग त्यांनी है व्रत ग्रहण केलें व पुढे याचे यथाविधि पालनहि केले. त्यावेळीं षोडशभावना भाविल्यामुळे त्यांना तीर्थकर कर्म प्रकृतीचा बंध पडला. पुष्कळ काल संसारसुखाचा अनुभव त्यांनीं घेऊन शेवटीं जिनदीक्षा घेतली. व्रत-तप-प्रभावानें ते अहमिंद्र स्वर्गांत देव झाले. तेथील आयुष्य संपतांच -या जंबूद्वीपांतील भरत क्षेत्रांत आर्थ खंड आहे. त्या मध्यें साकेता ( अयोध्या) नगरी आहे. तेथें पूर्वी नाभिराज नांवाचे चौदावे मनु-राज्य करीत होते. त्यांना मरुदेवी नामें सुशील धर्मपत्नि होती. तिच्या पोटीं तो पूर्वीचा सर्वार्थसिद्धीतील अहमिंद्रदेव च्यवून प्रथमपुत्र आदिनाथ तीर्थंकर नामे होऊन जन्मला या प्रमाणे या व्रताची कथा आहे.