व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासाच्या शुक्ल-पक्षांतील प्रथम गुरुवारीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करावी. आणि शुक्रवारी प्रातःकाळीं शुद्धोदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवले धारण करावीत. आणि सर्वपूजाद्रव्ये आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास मक्तोर्ने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा, श्रोपोठावर नवदेवता प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर गंधाने नऊ स्वस्तिकें काढून त्यांवर नऊ पाने मांडावीत. आणि त्यांच्यावर गंधाक्षता, फळे, फुलै वगैरे द्रव्ये ठेवावीत. मग त्यांची अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी पूजा करावी. पंचपकानांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांचीं अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे पूजन करावें. ॐ ह्रीं अर्हं अर्हत्सिद्धाचार्योपाध्याय सर्वसाधुजिनधर्मजिनागम-जिनचैत्यचैत्यालयेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. णमोकार मंत्राने १०८ वेळां जप करात्रा. श्रीजिनसइस्र-नामस्तोत्र म्हणून शास्त्रस्वाध्याय करावा. ही व्रतकथाहि वाचावी. नंतर एका पात्रांत नऊ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. आणि त्याने ओवाळीत मंगलारत्तो करावी. त्यादिवर्शी उपवास करून धर्मध्यानांत काळ घालवावा. सत्पात्रांस आहारादि दानें द्यात्रींत. दुसरे दिवशी पूजा व दान करून आपण पारणे करावे. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याप्रमाणें महिन्यांतून एकदां अथवा पक्षांतून एदां अगर आठवड्यांतून एकदां क्रमाने अशा रीतीनें नऊ पूजा पूर्ण झाल्यावर शेवटीं या व्रताचे उद्यापन करावे. त्यावेळी नवदेवता विधान करून महाभिषेक करावा, चतुःसंघांस चार प्रकारचीं दाने द्यावींत, नऊ दंप-तीस भोजन करवून त्यांना नूतन वस्त्रांचा आहेर करून त्यांच्या ओट्यांत नारळ, पान, सुपारी, केळीं वगैरे फळे, फुले, वगैरे घालून त्यांचा सन्मान करावा. असा या व्रताचा पूर्णविधि आहे दे मत पूर्वी विधिपूर्वक पालन केल्यामुळे ज्यांना सर्व मुखे प्राप्त झाली आहेत. त्यांची कथा पुढे सांगतों. ते तुम्ही शांतमनानें ऐका,一
– कथा–
पूर्व मेरुपर्वताच्या पश्चिम पूर्वविदेह क्षेत्रांत सीतानदीच्या काठीं मंगलावती नांवाचा एक मोठा देश आहे. त्यांत वत्सपुर नांवाचे एक मनोदर नगर आहे. तेथें पूर्वी नागदत्त नांवावा एक मोठा शुर, नीतिमान् व गुणवान् असा राजा राज्य करीत होता. त्याला वसुमति नामें एक रूपवती गुणवति व सुशील अशी पट्टस्त्री होती. नंदन, नंदिमित्र, नंदिपेण, वरसेन व जयसेन असे पांच पुत्र व यदुकां ता व श्रीकांता अशा दोन कन्या होत्या. शिवाय मंत्री, पुरोहित, राजश्रेष्ठी सेनापति वगैरे परिवारजन होते. यांच्यासह तो नागदत्त राजा सुखाने राज्य करीत असतां, – एके दिवशीं पिहितास्रव भट्टारक नांवाचे एक महा अवधिज्ञानी मुनीश्वर चर्येनिमित्त राजवाड्यासमोर आले. तेव्हां त्या राजाने त्यांचे विधिपूर्वक प्रतिग्रहण करून त्यांना आपल्या पाक-शाळेत नेले आणि त्यांना नवधामक्तीनें आहार दिला. त्यांचा निरंतराय आहार झाल्यावर ते तेथेच एका उच्चासनावर बसले, मग सर्वांनीं मोठ्या भक्तीने त्यांना नमस्कार केला. नंतर तो नागदत्त आपलीं दोन्हीं करकमले जोडून विनयानें त्यांना म्हणाला, हे ज्ञानसागर स्वामिन् ! आतां आपण आम्हांस सर्व सुखाला कारणीभूत असे एकादें व्रतविधान निरूपण करावे. ही त्याची नम्रोक्ती ऐकून ते पिहितास्त्रव मुनीश्वर राजांस म्हणाले, हे मव्य नृपोतमा ! आतां तुम्हांस नववासुदेव व्रत हे पालन करण्यास अत्यंत उचित आहे, असे म्हणून त्यांनीं त्या व्रताचा काल व विधि यथास्थित निवेदिला. ते ऐकून त्यांना मोठा संतोष झाला. मग तो नागदत्त राजा व त्यांची धर्मपत्नि वसुमति यांनी त्या मुनीश्वरांस नमोस्तु करून तें व्रत स्वीकारिले. त्यानंतर ते मुनीश्वर आशिर्वाद देऊन आपल्या स्थानीं निघून गेले.
त्यानंतर कालानुसार उभयतांनी ते व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केलें. त्या नत्रपुण्यफलाने पुढे पुष्कळ दिवस सुखाने राज्यैश्वर्य मोगिले. मग त्या नागदत्त राजांत या क्षणिक संसाराविषयीं वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे तो आपल्या ज्येष्ठ पुत्रास सर्व राज्यभार देऊन तपो-वनास गेला. आणि एका दिगंबर मुनीश्वरांजवळ जिनदीक्षा धारण करून घोरतपश्चर्या करूं लागला. मग अंतकालीं तो समाधिविधिर्ने मरून स्वगीत महर्द्धिक देव झाला. तेथे तो चिरकाल पुष्कळ सुख भोगू लागला.
तसेच ती वसुमती राणीही एका आर्थिकेजवळ दीक्षा घेऊन तपश्चरण करूं लागली. पुढे अंतीं समाधिविधीने मृत्यु पावून स्त्रीलिंग छेडून स्वगर्गात देव झाली. तेथे तो देव चिरकाल पुष्कळ सुख मोगू लागला.
पुढे क्रमाने ते दोघेहि देव आपल्या आयुष्यांतों तेथून व्यवून मनुष्य लोकांत क्षत्रिय राजे होऊन मोक्षास गेले आहेत. असे या व्रताचे माहात्म्य आहे.