.व्रतविधि – फाल्गुन कृ. ३० दिनीं या व्रत आइकांनी एकमुक्ति करावी. आणि चैत्र शु. १ दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलाने अभ्यंग स्नान करून अंगावर नूतनधौतवने धारण करावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्या-पथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर चतुर्विंशति तीर्थंकर प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. त्यांची अष्टद्रव्यांनी अर्चना करावी, श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चना करावे. देवापुढे एका पाटावर चोवीस पार्ने मांडून त्यांवर अक्षता, फळे, फुले,नैवेधे वगैरे ठेवावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं वृषभादिवर्धमानांत्य-वर्तमानतीर्थंकरेभ्यो यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्वें घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप एक करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. त्या दिवशी उपवास करावा. सत्पात्रांस आहारादि दानें यात्रीत. दुसरे दिवशी पूजा व दान करून पारणे करावे.
याममाणे पश्चांतून एकदां त्याच तिथीस पूजा करावी, अशा चोवीस २४ पूजा पूर्ण झाल्यावर याचे उद्यापन करावें. त्यावेळी चोवीस तीर्थकराराधना करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध-दाने यात्रींत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
या जंबू द्वोपांतील मेरुपर्वताच्या पूर्वविदेह क्षेत्रांत पुष्कला-बती नांवाचा एक विशाल देश आहे. त्यामध्ये पुंडरीकिणी नांवाचे एक अत्यंत मनोहर नगर असून तेथे पूर्वी प्रजापाल या नांवाचा राजा राज्य करीत होता. तो मोठा पराक्रमी, धर्मवान् व नीतिमान् असे. त्याग कनकमाला एक अत्यंत रूपवती, गुणावती पट्टराणी होती. इच्यापासून त्यांस लोकपाल नांवाचा गुणवान् पुत्र असून त्याळा रत्नमाळा धर्मपत्नि होती, तसेच कुबेरकांत श्रेष्ठो व त्याची कुवेर-दत्ता नामाची होती, शिवाय मंत्री, पुरोहित, सेनापति यांच्यासह हास्यविनोदांत कालक्रम करीत असे.
एके दिवशी त्या प्रासांदात चारणमुनीश्वर चर्यानिमित्ताने आले. तेव्हां त्यांचे प्रतिग्रहण करून राजाने पाकगृही त्यांना नेऊन प्रासुक आहार दिला. नंतर शांतरीतीने थोडावेळ बसून ते उपदेश देऊं लागले, तो ऐकल्यावर कुचेरता उर्फ सुखवतो मुनिस विनयाने म्हणाली, हे स्वामिन् ! आपण मजला उत्तम सुख प्राप्त होण्यासारखे एकादें बतविधान सांगावें, तेव्हां ते मुनिमहाराज म्हणाले, हे कन्ये ! तूं चतुर्विंशतिगणिनीव्रत है पालन कर. म्हणजे तुला स्वर्ग नव्हे मोक्षसुख मिळेल. असे म्हणून त्यांनी तिला सर्वविधि सांगितला. नंतर तिनें है बत स्वीकारिलें, हे पाहून सर्वांनी ते व्रत घेतलें. आणि विधि-पूर्वक पालन केले. त्यामुळे त्यांना स्वर्गमुख व क्रमानें मोक्षनुख मिळाले आहे.