व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-चैत्र शु. ४ दिनी एकमुक्ति आणि १ दिवशी उपवास, पूजा वैगेरे.
– कथा –
धावकी खंडांतोल पूर्व मंदराच्या अपरविदेह क्षेत्रांत सीता नदीच्या काठीं गंधिल नांवाचा देश आहे. त्यांत अयोध्या नामक एक पट्टण आहे. तेथे पूर्वी अर्हदास राजा राज्य करीत असे. त्याला सुप्रति व जिनदत्ता अशा दोन राण्या होत्या. सुप्रतीच्या उदरी वीतभय नामक पुत्र व जिनदत्तेच्या कुशीं विभीषण नामें पुत्र झाला होता. त्या शिवाय मनोहर मंत्री त्याची जी मनोरमा, श्रुतकीर्ति पुरोहित, त्याची भार्या मनोदत्ता, शूरसेन सेनापति व त्याची गृहिणी सुरदत्ता असा सर्व परिवार होता. एके दिवशीं-संजयंत नामक मुनिराज चर्येनिमित्त राजवाड्यांत आले. हे पाहून राजार्ने त्यांचे प्रतिग्रहण करून त्यांना पाकगृही नेऊन निरंतराय आहार दिला. नंतर कांहीं वेळ त्यांच्या मुखें उपदेश ऐकल्यावर राजाने विनयानें मुनींना वंदना करून एकादें उत्तमन्नत देण्याविषयी प्रार्थना केली. तेव्हां त्यांनीं त्याला है व्रत पालन करावयास सांगून त्याचा सर्वविधि सांगितला. मग राजानें सर्वांसह है व्रत त्यांच्या जवळ ग्रहण केले. मग मुनि निघून गेले. पुढे समभानुसार राजानें हे वत पाळिलें, व्यायोगानें त्यांना स्वर्ग व क्रमानें मोक्षाची प्राप्ति झाली आहे.