व्रतविधिः – श्रावणमासीं ज्या दिवशी उत्तरा नक्षत्र येईल त्या दिवशीं या व्रतिकांनी प्रभाती सुखोष्ण उदकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्खें धारण करावीत. सर्व पूजासामग्री हातीं घेऊन चैत्यालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. श्रीपीठावर शीतलनाथ तीर्थकर प्रतिमा ईश्वर यक्ष मानवी यक्षीसहित स्थापून तिला पंचा- मृतांनीं अभिषेक करावा. देवापुढें शुद्धभूमीवर दहा १० प्रकारची धान्यें पसरून सरोवर करावा. त्यावर नूतन वस्त्र पसरून त्याच्या चारी दिशेस जिरे, मीठ, गहूं, तांदूळ यांचे पुंज घालावेत. भिजीव हरभऱ्याचे (साई चणकाचे) पांच पुंज घालून त्याच्या मध्यभागी एक सुशोभित कुंभ ठेवावा. त्यावर एक ताट ठेवून श्रीशीतलनाथ प्रतिमा यक्षयक्षीसह बसवावी. दहापदरी सुताचे उपवीत [ होंगनूल] करून त्यास हळद लावून देवापुढे ठेवावें. मग अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची व ज्वालामालिनी, पद्मावती, रोहिणी यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें. दहा पोळ्या, कडाकण्या, पायस वगैरे पकाने लावून दहा चरु करावेत. ॐ हीं श्रीं क्लीं ऐं अई शीत- लनाथतीर्थकराय ईश्वरयक्ष मानवीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥
या मंत्राने १०८ पीतवर्णाची सुगंधीपुष्ये घालावीत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्थ करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळा- रती करावी मग देवापुढील उपबीत (होगनूल) आपल्या गळ्यांत घालावें. ब्रह्मचर्यपूर्वक उपवास करावा व धर्मध्यानांत काल घालवावा. याच क्रमानें १० दिवस पूजा करावी. हे व्रत पांच बर्षे उपर्युक्त क्रमाने करून उद्यापन करावें. त्यावेळी शीतलनाथ विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दानें देऊन त्यांना आवश्यक वस्तुद्धि द्याव्यात. दहा सुवासिनी स्त्रियांना आपल्या घरी भोजन करवून फलपुष्पादिकांनीं युक्त दहा वायनें द्यावीत मग आपण पारणा करावी. असा या व्रताचा पूर्ण विधी आहे.